Hrishikesh Kanade Passes Away: मराठी सिनेसृष्टीतून (Marathi Film Industry) एक दु:खद बातमी समोर येत आहे. हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेता ऋषिकेश कानडे (Hrishikesh Kanade) यांचं निधन झालं आहे. 3 ऑगस्ट 2026 म्हणजेच सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन (Actor Death) झालं आहे. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं असल्याची माहिती आहे. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. ऋषिकेश कानडे  हे एक प्रगल्भ अभिनेता होते. तसेच ते देशप्रेमी होते. त्यांच्या निधनानंतर कानडे कुटुंबावर (Hrishikesh Kanade Family) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Continues below advertisement

ऋषिकेश कानडे यांचं अल्पशा आजाराने निधन (Marathi Actor Hrishikesh Kanade)

'मी भारतीय' ही एक देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनांवर आधारित नाटक आहे. याचे जवळपास 300 प्रयोग करताना  त्यांच्या देशप्रेमाचं प्रत्यंतर यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान देताना ते महाराजमय होऊन जायचे. प्रत्येक भूमिका साकारत असताना, त्या भूमिका जगत होते.  जीव ओतून ऋषिकेश कानडे भूमिका साकरत होते.  त्यांच्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांकडून प्रेम आणि दाद मिळायची.   प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी घर तयार केलं होतं. 

ऋषिकेश कानडे यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार (Hrishikesh Kanade Passes Away at 38)

ऋषिकेश कानडे यांना आपल्या कारकि‍र्दीत राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवण्यात आले.  त्यावेळी त्यांचं कौतुकही करण्यात आलं.  ऋषिकेश कानडे यांच्या पश्चात् आई - वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे.  अभिनयव्यतिरिक्त ते स्वत:चा ऑनलाइन फिटनेस क्लब देखील चालवायचे. ते पुण्यातील रहिवासी होते.  माहितीनुसार, ऋषिकेश कानडे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ऋषिकेश कानडे यांच्या निधनानंतर पुण्यातील रंगकर्मींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तसेच चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?

Tumbadchi Manjula OTT: हॉरर अन् कॉमेडीचा तडका; 'तुंबाडची मंजुळा' आता घरबसल्या पाहा, OTTवर कधी रिलीज होणार?