Ashadhi wari 2026: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2026) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (25 जुलै रोजी) पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय महापूजा केलीय. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Vitthal Rukmini Mahapooja) शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिवच्या (Dharashiv) कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असणारे माने दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरलेआहे. विठ्ठल मंदिरात आलं की उर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडु दे, हेच विठुरायाकंडे साकडे घातले. तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधान मोदींना (PM Modi)आर्शीवाद द्यावा. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. तरपहाटेपासूनचपंढरपुरात वारकऱ्यांच्याभक्तीचाअलोटमहासागरसध्याअनुभवायलामिळालाआहे. तरभक्तांची 20-25 किलोमीटरपर्यंत रांगालागल्याचेचित्रआहे. एकूणचचंद्रभागेच्यातिरावरभक्तांचामहापूरदेखीलविठ्ठलनगरीतअनुभवायलामिळतोआहे.
दरम्यान, विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील रहिवासी असणारे आणियंदाचे मानाचे वारकरी असलेले माने दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि माने दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विठ्ठल मंदिरात आलं की उर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडु दे, हेच विठुरायाकंडे साकडे घातले. तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधानमोदींना आर्शीवाद द्यावा. अशीप्रतिक्रियामुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीदिली. पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिराच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. विठ्ठलाची शासकीय पूजा झाल्यानंतर आळंदी देवस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन भक्तनिवास उभं केले जात आहे. याचच भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिरा सोबतच नवे भक्तनिवास लवकरच उभारले जाणार आहे.
Ashadhi wari 2026: कॉरिडोरमुळे जुने पंढरपूर होणार इतिहास जमा, वारकऱ्यांकडून जुन्या पंढरपूरचे रूप घेताय डोळ्यात साठवून
या आषाढी एकादशीनंतर जुने पंढरपूर इतिहास जमा होणार असून मंदिर परिसरात विशाल असा कॉरिडॉर उभा करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे शेकडो वर्षांचे वाडे आणि जुन्या इमारती इतिहास जमा होणार आहेत. यंदाची आषाढी ही आमच्या पिढ्यान पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील, हे कटू आठवण म्हणून आम्ही ती जतन करू. अशा पद्धतीचे निराशाजनक उद्गार मंदिर परिसरातील बाधित नागरिकांकडून काढण्यात येत आहेत. मात्र, या कॉरिडॉरनंतर भविष्यात पुढील पन्नास वर्षाचा भाविकांचा विचार करून ही विकास कामे सुरू केली आहे, असेहीतेम्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
