Salman Khan Comment On Katrina Kaif Vicky Kaushal Baby Announcement Post: बॉलिवूडच्या (Bollywood News) मोस्ट फेवरेट्स कपल्सपैकी एक असलेल्या कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) घरी नुकतंच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. दोघांनाही पुत्ररत्न प्राप्त झालं असून विक्की कौशलनं सोशल मीडियावर पोस्ट करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 7 नोव्हेंबर रोजी विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट (Vicky Kaushal Instagram Post) शेअर करुन मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर केली. या पोस्ट अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन जोडप्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सर्व सेलिब्रिटींच्या कमेंट्समध्ये एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं. ती पोस्ट होती, बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खाननं (Salman Khan) विक्की आणि कतरिनाच्या पोस्टवर कमेंट केल्याची. तेव्हापासूनच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये दावा करण्यात आला आहे की, सलमान खाननं लिहिलंय की, "मित्रा, या सर्व खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नकोस..." (ये सब प्राइवेट चीजें इंटरनेट पे मत डाला करो यार...) ही पोस्ट बघता बघता खूप व्हायरल झाली, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं की, ही कमेंट खरोखर सलमान खाननं केली होती का? दरम्यान, काही काळानं सर्वांनाच कळालं की, ही कमेंट खोटी होती. मुळात सलमान खाननं कतरिना, विक्कीच्या पोस्टवर कोणतीही कमेंट केलेली नाही.
खरं तर, सलमान खाननं कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या पोस्टवर सार्वजनिकरित्या कोणतंही भाष्य केलेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर ही पोस्ट खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे. हे कळाल्यानंतर, लोक आता पोस्टवर कमेंट करत आहेत आणि असं न करण्याचा सल्ला देत आहेत.
विक्की-कतरिनानं सोशल मीडियावर काय पोस्ट केलेली?
कतरिना कैफ आणि विक्की कौशल (Katrina Kaif & Vicky Kaushal) यावर्षी लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करत आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये, त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमार्फत चाहत्यांना याबाबत माहिती दिली. कतरिना आणि विक्कीनं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये लिहिलेलं की, "आनंद आणि कृतज्ञतेनं आपल्या आयुष्यातील सर्वात अद्भुत अध्याय सुरू करतोय..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :