Salman Khan : चित्रपटातील कलाकार नेहमी त्यांच्या चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सलमान खान (Salman Khan) हा त्यांच्या फिटनेसनं आणि स्टाईलनं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. सलमानचा बॉडी डबल असणारा परवेज काजी हा अगदी हुबेहुब सलमान सारखा दिसतो. सलमानसारखा दिसणारा हा परवेज काजी (Parvez Kazi) आहे तरी कोण? आणि त्यानं सलमानसोबत कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलंय ते जाणून घेऊयात...


परवेज काजी हा सोशल मीडियावर चर्चेत असतो. परवेज हा सलमान सारखा फिट आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या  ‘राधे: योर मोस्ट वान्टेड भाई’ या चित्रपटामुळे परवेजला विशेष प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो तसेच सलमान खानसोबतचे फोटो परवेज हा सोशल मीडियावर शेअर करत होता. परवेज हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. त्याच्या फोटोला आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. परवेजच्या फोटोमधील लूक्सचं अनेक जण कौतुक करतात. 


पाहा व्हिडीओ: 






सलमानच्या या चित्रपटामध्ये केलं परवेजनं काम 
परवेज काजीनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटामधूनच त्यानं सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यानं टायगर जिंदा है, दबंग 3, रेस 3, भारत आणि राधे या चित्रपटामध्ये सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केलं. 


सलमान खान हा लवकरच बिग बॉस-16 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बिग बॉस-15 चे सूत्रसंचालन करण्यसाठी सलमाननं जवळपास  350 कोटींचे मानधन घेतले होते. रिपोर्टनुसार, आता सलमाननं बिग बॉसच्या 16 व्या सिझनसाठी 800 कोटी मानधन घेतलं.


वाचा इतर बातम्या: 


Bigg Boss 16 : भाईजानच्या बहुचर्चित कार्यक्रमात फरमानी नाजची एन्ट्री? 'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू