Salman Khan And Nayanthara New Film: बॉलिवूडचा 'सुल्तान' अर्थात सलमान खान सध्या त्याचा आगामी 'मातृभूमि' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचे सिनेमे चाहत्यांसाठी केवळ चित्रपट नसून, एक उत्सवच असतो. सलमान खानचे ईदसोबतचे नाते जुने आणि तितकेच घट्ट आहे. ईद या सणानिमित्त सलमान खान आपला सिनेमा रिलीज करतो. फॅन्स देखील त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, सलमान खानने नुकतंच एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना खूश केलं आहे. त्यानं आपल्या आगामी चित्रपटाची झलक शेअर करुन चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.
'मातृभूमि'नंतर सलमान खानचा आगामी सिनेमा कोणता? (Salman Khan Upcoming Project)
'मातृभूमि'नंतर सलमान खान 2027 साली आपल्या नेक्स्ट प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खानचा आगामी अॅक्शन थ्रिलर सिनेमा 2027 च्या ईद या सणाला प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची टीम आहे. या आगामी प्रोजेक्टसाठी सलमान खान साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर वामशी पैडिपल्ली आणि दिग्गज निर्माते दिल राजूसोबत काम करणार आहे.
सलमान खानने शेअर केली आगामी चित्रपटाची झलक (Salman Khan upcoming movie Eid Release)
सध्या प्रोजेक्टला 'SVC63' हे नाव देण्यात आलं आहे. ही जबरदस्त अॅक्शन थ्रिलर फिल्म असल्याचे म्हटले जात आहे. सलमान खानने या चित्रपटाचा रिलीज डेट शेअर करत, आपल्या चाहत्यांसाठी एक मजेशीर आणि सस्पेंसने भरुन एक मेसेज शेअर केला आहे. सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'थोडा दूरदृष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, म्हणूनच ईद रोजी रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू. धीर धरा.. थोडं धीर धरा. मी जितका वेळ वाट पाहिली आहे. तितकाच वेळ तुम्हालाही वाट पाहावी लागले. तुमची जी अवस्था आहे, तीच माझीही अवस्था आहे...हाहाहा' असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान दिसतो आहे. तसेच अभिनेत्री नयनतारा दिसत आहे. या सिनेमात नयनतारा झळकणार हे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. 2027 साली प्रदर्शित होणारा सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार, असंही चाहत्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
