Ramchandra Gaonkar Interview Raja Shivaji:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा धगधगता इतिहास 'राजा शिवाजी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची गाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. या सिनेमासाठी रितेश देशमुखने विशेष मेहनत घेतली.  त्याने घेतलेले कष्ट, मेहनत या सिनेमाचा ट्रेलर पाहूनच समोर येते.  या सिनेमात रितेश देशमुख व्यतिरिक्त मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडच्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर याचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्याचे काही अॅक्शन सीन्स आहेत.  रितेश देशमुखसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? याबाबत त्यानं माहिती दिली. 

Continues below advertisement

रितेश देशमुखसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? (Ramchandra Gaonkar interview Raja Shivaji Film experience)

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गावकरने 'राजा शिवाजी' चित्रपटात काम करतानाचा अनुभव शेअर केला. 'या ऐतिहासिक सिनेमात मी अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. रितेश देशमुख सरांसोबत माझ्या काही अॅक्शन सीन्स आहेत. या अॅक्शन सीन्सचं शूटिंग जवळपास 7 दिवस सुरू होतं.   खास अॅक्शन सीक्वेन्ससाठी परदेशातून टीम बोलावण्यात आली होती.    विविध पद्धतीने अॅक्शन सीन्स सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारीत हा सिनेमा असल्यामुळे  परदेशातून आलेल्या अॅक्शन टीमला योग्य प्रकारे याची माहिती देण्यात आली होती'.

या ऐतिहासिक सिनेमात काम करताना कधीही दडपण आलेलं नाही

'रितेश सरांसोबत काम करताना 7 दिवसांत एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, रितेश देशमुख सरांचा 'राजा शिवाजी' या सिनेमातील अगदी छोट्यातल्या छोट्या भूमिकांचा  अभ्यास पक्का होता. एवढे मोठे आर्टिस्ट जेव्हा तुमच्या समोर असतात, तेव्हा निश्चितच आव्हानात्मक असतं. परंतु, या सिनेमात काम करताना कधीही दडपण आलेलं नाही', असं रामचंद्र गावकर म्हणाला.

Continues below advertisement

'राजा शिवाजी' सिनेमात रामचंद्र गावकर कोणत्या भूमिकेत दिसणार? (Ramchandra Gaonkar as Rangotri)

''राजा  शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात मी रंगोत्री हे  पात्र  साकारत आहे.  या सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर आपण पाहिलाच असेल.  या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मला शिक्षा देतात. मला महाराज शिक्षा का देतात? शिक्षा देण्यासारखा मी कोणता मोठा गुन्हा करतो?   हे सगळं तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल'. 

रितेश सरांबाबतीत भावलेली गोष्ट कोणती? (Riteish Deshmukh as Chhatrapati Shivaji Maharaj)

'सिनेमाच्या सेटवर रितेश सर नेहमी सर्वांशी आदराने बोलत होते.  मी एक अभिनेता असण्यासोबत एक दिग्दर्शकही आहे.  माझ्या सिनेमाचं शूटिंगही तेव्हा सुरू होतं.  मी पहिल्यांदा जेव्हा रितेश सरांना भेटलो, तेव्हा त्यांनी माझी आपुलकीने विचारपूस केली. जेव्हा एवढा मोठा अभिनेता आणि दिग्दर्शक माझ्यासारख्या नवोदित दिग्दर्शकाला चित्रपटाबद्दल विचारतो, तेव्हा ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ही बाब अविस्मरणीय आहे', असंही रामचंद्र गावकर म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहरुखचा लेक आर्यन खानचा मित्राच्या लग्नात राडा, बूट पळवताना झटापट VIDEO