Salman Khan and sonali bendre Ramayana: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनीत 'रामायण: पार्ट 1' (Ramayan Part 1) मुळे चर्चेत आहे.  या सिनेमाचा ट्रेलर पाहून अनेकांनी पौराणिक कथेवर आधारित या चित्रपट पाहण्याची उत्सुकता दर्शवली.  पण तुम्हाला माहिती आहे का, या आधी सलमान खानचा भाऊ अभिनेता - दिग्दर्शिक  सोहेल खान (Sohail Khan) देखील पौराणिक कथेवर आधारीत 'रामायण' सिनेमा तयार करणार होता?   या सिनेमात खास भगवान श्री राम  (Jai Shree Ram)यांची भूमिका अभिनेता सलमान खान साकारणार होता. तर, माता सीता (Seeta) या रोलसाठी सोनाली बेंद्रे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती.   पण हा सिनेमा काही तयार झाला नाही. चित्रपट तयार न होण्यामागचं कारण काय? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

सोहेल खानचा एक जुना प्रोजेक्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 90 च्या दशकात सोहेल खान रामायणावर आधारीत 'रामायण' हा सिनेमा साकारणार होता.  सिनेमाची शूटिंग साधारण 40 टक्के पूर्ण झाली होती.  या सिनेमात सलमान खान श्री राम यांची भूमिका साकारत होते. तर, सोनाली बेंद्रे ही माता सीता यांच्या भूमिकेत झळकणार होती.  पण या सिनेमाचं काम पूर्ण का नाही झालं? कुठे मिठाचा खडा पडला?

पूजा भट्टमुळे प्रोजेक्ट रखडला (Salman Khan and sonali bendre in Ramayana unfinished film)

सोहेल खानच्या 'रामायण' या सिनेमात अभिनेत्री पूजा भट्ट हिची देखील एक महत्त्वाची भूमिका होती. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान, सोहेल आणि पूजामधील जवळीक वाढत चालली होती. दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते, या गोष्टीचा स्वत: पूजा भट्टने एका मुलाखतीत खुलासा केला.   सोहेल खानचे वडील, सलीम खान यांच्या हस्तक्षेपानंतर सोहेल खान पूजा यांच्यातील नाते फार वेळ काही टिकला नाही. 

Continues below advertisement

यानंतर दोघांमधील प्रोफेशनल रिलेशनशिपमध्येही दुरावा आला.  त्यांच्यातील व्यावसायिक संबंधही बिघडले. अखेर या सिनेमाचं शूटिंग बंदल पडलं.  

नितेश तिवारी 'रामायण: पार्ट 1' कधी रिलीज होणार?

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण: पार्ट 1' हा एक मेगा बजेट सिनेमा आहे.  साधारण 4000 कोटी बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.  या सिनेमात रणबीर कपूर, साई पल्लवी, यशसह इतर दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा दोन पार्टमध्ये तयार होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या निधनानंतर सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...