Salim Khan On Amitabh Bachchan : सक्सेसनंतर अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नातं जोपासलं नाही अशी खंत दिग्गदर्शक सलीम खान (Salim Khan) यांनी व्यक्त केली आहे. मुलगा अरबाज खान याच्या एका शोमध्ये सलीम खान यांनी अमिताभ बच्चन आणि आपल्या नात्याबद्दल खुलासा केलाय. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबतचे नातेसंबंध कायम ठेवले नसल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
अमिताभ बच्चन आणि सलीम खान यांची 1973 च्या 'जंजीर' या हिंदी चित्रपटापासून चांगली जोडी बनली. जंजीर या चित्रपटाआधी अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्तानी, एक नजर , बॉम्बे टू गोवा या सारख्या चित्रपटात काम केले आहे. तर सलीम खान यांनी शोले , डॅान, दिवार, त्रिशूळ या सारखे ब्लॉगब्लास्टर चित्रपट केले आहेत. पण अमिताभ बच्चन यांना जंजीर या चित्रपटाने 90 च्या काळात स्टार बनवले होते. पण जंजीर या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि सलीम खान यांची मैत्री तुटली. अमिताभ बच्चन आणि सलीम खान यांची मैत्री तुटण्यामागील अनेक कारणे सांगतली जातात.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ' यही रंग यही रुप ' या पुस्तकात सलीम यांच्यासोबतची मैत्री तुटण्याबाबत एक प्रसंग लिहीला आहे. "अमिताभ बच्चन यांना जे काम आवडत नसे ते काम सलीम खान त्यांना करायला लावत असत. चित्रपटातील गाणी मला लिहायला सांगायचे. पण मला चित्रपटासाठी गाणी लिहायला अजिबात आवडत नव्हते. या करणामुळे मी सलीम खान यांच्या बरोबरची मैत्री तोडली, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.
अरबाजच्या शोमध्ये सलीम खान यांनी अमिताभ बच्चनसोबतच्या मैत्रीबाबत सांगतले आहे. "माझ्यामुळे अमिताभला जंजीर हा चित्रपट मिळाला. जंजीर या चित्रपटानंतर अमिताभ मोठा अभिनेता झाला. त्यानंतर अमिताभने माझ्याशी बोलणे सोडून दिले असे सलीम खान यांनी सांगितले.
जंजीर या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्या आधी सलीम खान यांनी दिलीप कुमार , धमेंद्र , देवानंद यांना ऑफर दिली होती. परंतु, या सर्वांनी सलीम खान यांची ऑफर नाकारली. त्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. यानंतर अमिताभ बच्चन यांना अनेक चित्रपट मिळाले. जसे चित्रपट मिळत गेले तसं- तसं अमिताभने आमची मैत्री तोडली असं सलीम खान यांनी सांगितलं. आपण जसे-जसे मोठे होत जातो तेव्हा तुमची जबाबदारी वाढत जाते. पण याचा अर्थ असा होत नाही की पाठीमागील सर्वांना विसरुन जा. ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यांच्यासोबत थोडा तरी संपर्क ठेवणे गरजेचे आहे, असे सलीम खान यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट (Amitabh Bachchan)
आनंद , सौदागर , शोले , अमर अकबर अँथनी , परवरीश , गोलमाल , दोस्ताना , दिवार , पा , बुढा होगा तेरा बाप , पिकू
सालीम खान यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट (Salim Khan )
शोले , डॉन , दीवार , मजबूर , यादों की बारात , सीता और गिता , हाथी मेरे साथी