India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या महत्त्वाच्या कसोटी मालिकेचे सामने 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात पोहोचला आहे. दरम्यान भारतीय खेळपट्ट्यांचा विचार करता फिरकीपटूंचा दबदबा दिसून येतो. त्यात या महत्त्वाच्या मालिकेत अनेक फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve smith) आणि भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) हे दोघे पहिल्या क्रमांकावर असतील. कारण य दोघांमध्ये आतापर्यंत जबरदस्त लढत पाहायला मिळाली असून यंदाही पाहायला मिळणार हे नक्की. या ट्रॉफीमध्‍ये आत्तापर्यंत दोघांची एकमेंकाविरुद्धती आकडेवारी कशी आहे ते जाणून घेऊया...

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्टीव्ह स्मिथ VS आर अश्विन

आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि आर अश्विन यांच्यात कमालीची झुंज दिसून आली आहे. अश्विनने स्मिथसमोर आतापर्यंत एकूण 694 चेंडू टाकले आहेत. यामध्ये स्मिथने एकूण 412 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकूण 450 चेंडू डॉट बॉल्स देखील झाले आहेत. स्मिथने आतापर्यंत अश्विनला एकूण 34 चौकार आणि पाच षटकार ठोकले आहेत. याशिवाय अश्विनने स्मिथला एकूण 6 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये त्याने स्मिथला 2013 मध्ये एकदा, 2017 मध्ये दोनदा, 2020 मध्ये दोनदा आणि 2021 मध्ये एकदा बाद केलं. बॉर्डर-गावस्कर मालिकेत स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणारा अश्विन हा पहिला गोलंदाज आहे. यानंतर रवींद्र जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाडेजाने 4 वेळा स्मिथची विकेट घेतली आहे. अशा स्थितीत यावेळीही अश्विन आणि स्मिथ यांच्यातील लढत पाहण्यासारखी असेल. त्याचबरोबर जाडेजाही फिट झाल्यानंतर संघात परतल्याने स्मिथची डोकेदुखी वाढली आहे.

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 9-13 फेब्रुवारी 2023  नागपूर
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी 2023 दिल्ली
तिसरा कसोटी सामना 1-5 मार्च 2023  धर्माशाला
चौथा कसोटी सामना 9-13 मार्च 2023  अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-