मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने मराठी सिनेमाच्या बॉक्स ऑफीसचा नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे. नवख्या कलाकारांना घेऊन नागराज मंजुळे (Nagraj manjule) यांनी सिनेसृष्टीत इतिहास घडवला. त्यामुळेच, सैराट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्ची, परश्या, सलिम, प्रदिप ही सगळी पात्र त्यांची स्टाईल त्यांच लूक प्रत्येकाला लक्षात आहे. मात्र यांच सिनेमामधला प्रदिप बनसोडे म्हणजेच आपल्या सगळ्याचा लाडका अभिनेता तानाजी गलगुंडे यांचा नवा लूक पाहून तुम्ही देखील हैराण व्हालं. मोनालिसा बागल आणि तानाजी गलगुंडे (Tanaji galgunde) ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सैराटच्या यशानंतर सैराट सिनेमातील कलाकारांना 70 मिमि पडद्यावर पाहायला सर्वांनाच आवडतं. या कलाकारांना नेहमीच स्क्रीनवर पाहायला आवडत असून गेस्ट आणि भिरकीट या सिनेमातही तानाजीने भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचंही कौतुक झाला. आता, हीच जोडी आपल्याला आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 


तानाजी गलगुंडे आणि मोनालिसा बागल यांच्या लीड रोलमधील नवा चित्रपट '13 लीला विला' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच दिग्दर्शन सिराज अरब ह्यांनी केलं असून मैत्री फिल्म प्रोडक्शन ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. नुकतंच या सिनेमातील मोनालिसा बागल आणि तानाजी गलगुंडेचा लूक समोर आला आहे. या सिनेमात तानाजी एका श्रीमंत घरातील मुलगा वाटतोय, पांढ-या रंगाचा शर्ट आणि पांढ-या रंगाची पँन्ट, डोळ्यावर काळा गॉगल आणि धमाल केसांची हेअर स्टाईल. तानाजीच्या गळ्यातील सोळ्याची मोठी चैन, हातात घड्याळ जणू काय गावाताला पाटील किंवा सावकारच असल्याचं दिसून येत आहे.


तानाजीसोबत प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागलही या चित्रपटात झळकणार आहे. झल्ला बोभाटा, सौ. शशि देवधरसारख्या अनेक सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची छाप टाकली. मात्र, या सिनेमाती मोनालिसा एक सोज्वळ सुंदरी दिसून येते. टिपिकल साउथ इंडियन लूकमध्ये ती सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे जशी ही धमाल जोडी आहे, तसंच कमाल कॉम्बिनेशनही तानाजी व मोनालिसांचं या लूकमधून पाहिला मिळतयं. त्यामुळे, आता सिनेमाच्या नावाची आणि त्यांतील कथा नेमकी काय असेल, याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. सैराटनंतर दुसऱ्या सिनेमात कुठल्याही कलाकाराला तेवढा फेम मिळाला नाही, किंवा तेवढं नावही झालं नाही. त्यामुळे, सैराटनंतर सैराट कलाकारांच्या हीट, सुपरहीट सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. म्हणूनच, तानाजीच्या नव्या लूकचा नवा सिनेमा कधी रिलीज होणार याचीही उत्कंठा चाहत्यांना आहे. 


हेही वाचा 


पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल