Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) तीन दिवसांपूर्वी त्याच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. घरात घुसण्याआधी आरोपीनं सैफच्या घराची रेकी केली असल्याचं बोललं जात आहे. तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी सैफच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता आरोपीच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सुत्रांच्या वतीनं समोर येत असलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्य घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं हेरुन आरोपीनं रेकी केल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची रेकी केली असल्याची माहिती मिळत आहे. वांद्र्यातून एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालककडून या सेलिब्रेटिंच्या घराची माहिती आरोपीनं मिळवली होती. त्यापैकी सैफ अली खानचं घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यानं आरोपीनं ते घर निवडलं.
आरोपी सैफचा मुलगा जहांगीरला (जेह) ओलीस ठेवून पैशांची मागणी करणार होता. पण, हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्यानं आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीनं केले आणि तिथून फरार झाला. आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता, त्यासाठीच पैश्यांची व्यवस्था आरोपी करत होता, अशीही माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे.
सैफवर हल्ला केल्यानंतर ढाराढूर झोपलेला आरोपी
सैफवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीनं इमारतीतून पळ काढला खरा, पण त्यानंतर तो बेदरकारपणे फिरत होता. हल्ला केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्यानंतर निवांतपणे झोपला. उठल्यानंतर त्यानं सर्वात आधी कपडे बदलले आणि तिथून चालत वांद्रे स्थानक गाठलं. त्यानंतर तिथून दादरला आला, दादरहून वरळीला आला. वरळीत यापूर्वी काम केलेल्या कॅफेमध्ये रात्रभर थांबला. आरोपीला बांगलादेशला पळून जाण्यासाठी बनावट पासपोर्टची गरज होती. त्यामुळे त्याला पैसे लागणार होते. म्हणून तो कामाच्या शोधात होता. कामासंदर्भात एका व्यक्तीला भेटून आरोपी तिथून ठाण्याला निघून गेला.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Case Update:सैफच्या हल्लेखोराच्या जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्यरुपांतर करणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :