Sai Tamhankar on Harrasment: मराठी असो किंवा हिंदी, सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफूल चेहरा म्हणजे सई ताम्हणकर. तिनं अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सईचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. अभिनेत्री आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. वैयक्तिक आयुष्यात घडणारे किस्से अभिनेत्री शेअर करत असते. अलिकडेच अभिनेत्रीने आपल्या मुलाखतीतून धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीची बसमध्ये एकाने छेड काढली होती, याचा खुलासा तिनं मुलाखतीतून केला. यानंतर सईने छेड काढणाऱ्याची कशी अद्दल घडवली? याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं.
छेड काढणाऱ्याची अभिनेत्रीने कशी जिरवली? (Sai Tamhankar on Harrasment)
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'पुरुषांच्या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागला आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला. माहितीनुसार, सांगली मुंबई प्रवास करत असताना एका व्यक्तीने तिची छेड काढली होती, याचा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला, सई म्हणाली, 'सुरुवातीच्या काळात मी बसने प्रवास करायचे. सांगली ते मुंबई असा माझा बसने प्रवास असायचा'.
'रात्री मी बसमध्ये बसायचे. सकाळी ती बस मला मुंबईला सोडायची. प्रवास करत असताना माझ्या मागे एक मुलगा बसला होता. तो काही काळ बघत होता. नंतर त्यानं मागून माझ्या कंबरेत हात घातला. मी तेव्हा खूप घाबरले. पण मी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. मी त्याचा हात ओढला आणि मुरगळला. जर पुन्हा हा हात पुढे आला तर, हात मोडून मिळेल'.
'मुलाचा हात मुरगळल्यानंतर तो जोरात ओरडला. अशा गोष्टींबाबत बेधडक राहते', अशा प्रकारे सईने न घाबरता छेड काढणार्याला जबरदस्त अद्दल घडवली. तसेच धाडसाने या गोष्टीचा सामना करत त्याला धडा शिकवला. अभिनेत्री सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.
महतत्त्वाच्या इतर बातम्या:
