Sahitya Akademi Award 2024 : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार ( sahitya akademi award 2024) सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ ( Sudhir Rasal) यांना यंदाचा हा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरुप या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


यंदा 21 भाषांमधील साहित्यिकांना हा पुरस्कार जाहीर झालाय. कोंकणी भाषेचा पुरस्कार मुकेश थली यांच्या रंगतरंग या लेखसंग्रहाला मिळालाय. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारमुळे आंनद झाला असून, आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.                                                              


सुधीर रसाळ यांनी काय म्हटलं?


पुरस्कार मिळाल्यानंतर सुधीर रसाळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत म्हटलं की, हा पुरस्कार भारतात सर्वात सन्मानाचा पुरस्कार आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त समाधान या पुस्काराने मिळवून दिलं आहे. मोठ मोठे समीक्षक, विचारवंत यांना या पुरस्कार देण्यात आला आहे. तेव्हा अशा मोठ्या माणसांसोबत आपलं नाव जोडलं गेलंय याचा आनंद आहे.                                 


साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदाच्या वर्षासाठी जी पुस्तकं पाठवण्यात आली होती, ती सगळीच तुल्यबळ होती. नदिष्ठ, भुरा, बौन हा सौमित्र यांचा कवितासंग्रह होता, अभिराम भडकमकरांच्या इन्शाअल्लाह ही कांदबरी होती, अशा 12 पुस्तकांमधून विंदांचं जे समीक्षात्मक पुस्तक आहे, त्याची निवड करण्यात आली आहे. सुधीर रसाळ हे समीक्षकांमधलं फार मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार अत्यंत योग्य असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या जात आहेत.  



ही बातमी वाचा : 


Abhijit Amkar : नऊ वर्षांपूर्वी पदार्पण अन् आता त्याच वाहिनीवर दमदार कमबॅक, स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत अभिनेता साकारणार मुख्य भूमिका