Sachin Pilgaonkar On Amjad Khan Sholay Movie Dialogue: मराठी सिनेसृष्टीचे (Marathi Indusry) महागुरू म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Movie) काम केल्यानंतर त्यांनी मराठी सिनेसृष्टीतही (Marathi Movie) अनेक सिनेमे केले. 'बालिका वधू', 'पारध', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता', 'बचपन', 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.  सचिन पिळगांवकरांनी गाजलेला एव्हरग्रीन सिनेमा 'शोले'मध्येही (Sholey Movie) काम केलेलं. 'शोले'तील प्रसिद्ध डायलॉग 'कितने आदमी थे...' हा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण, अमजद खान यांच्या भारदस्त आवाजातला हा प्रसिद्ध डायलॉग ऐकला की, सर्रकन अंगावर काटा येतो. पण, हा डायलॉग आणि अमजद खान यांच्या भारदस्त आवाजाच्या मागे सचिन पिळगांवकरांची मेहनत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी 'शोले' मधला प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना व्यवस्थित बोलता येत नसल्याचं सांगितलं. ते ज्यावेळी डायलॉग बोलत होते, तो पातळ आवाजात ऐकू येत होता. पण, तो डायलॉग भारदस्त आवाजात हवा होता.  त्यानंतर सचिन पिळगांवकरांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेलं आणि अमजद खान यांच्याकडून डायलॉग बोलून घेतला. त्यानंतर तोच डायलॉग 'शोले' सिनेमाचा प्राण झाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

सचिन पिळगांवकरांनी काय सांगितलं? 

मराठी अभिनेते सचिन पिळगांवकरांनी सांगितलं की, "शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभं केलं आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे... त्यांना सांगितलं ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो...", 

"मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल... कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता... आणि पहिला डायलॉग "कितने आदमी थे..." आधी त्यानं वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेलं... मी त्याला सांगितलं नाही, असं नाही... नीचे के सूर मे बोल... पट्टी पुरी नीचे कर... Because I Am A Singer Also... मला ऑक्टिम्स कळतात... त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे...", असं सचिन पिळगांवकर म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Marathi Actor Manmohan Mahimkar: ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला हलाखीचे दिवस, दोनवेळच्या खाण्याची भ्रांत, म्हणाला, 'पैशांअभावी मटण खायची इच्छा मरुन गेली'