Sachin Pilgaonkars Statement On Rajkumar Barjatya: मराठी सिनेसृष्टीचे (Marathi Industry) महागुरू, सचिन पिळगावकर (Sachin Pilgounkar) अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. सचिन पिळगावकर 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं. सध्या त्यांच्या अनुभवांचे किस्से सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. असाच एक नवा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ते थेट राजकुमार बड़जात्या यांच्या विषयी बोलताना दिसत आहेत. सचिन पिळगावकर व्हिडीओत सांगताना दिसतात की, ज्येष्ठ निर्माते राजकुमार बडजात्या यांनी माझं गाणं ऐकलं आणि मगच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Continues below advertisement

Continues below advertisement

सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले? 

मराठी अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकरांनी व्हिडीओमध्ये एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलंय की, निर्माते राजकुमार बडजात्या हे आजारी होते. त्यांची तब्बेत खालावली होती. त्यांचा नातू त्यांच्यासोबत होता. त्यावेळी त्यांच्या नातवानं राजकुमार यांना विचारलं की, तुमची इच्छा काय आहे...? त्यावर ते म्हणाले की, "मला सचिनचं ते 'शाम तेरी बनसी पुकारे राधा नाम' हे गाणं पाहायचं आहे. मला सचिनला पाहायचं आहे." त्यानंतर त्यांन हे गाणं YouTube वर दाखवण्यात आलं. हे गाणं पाहिल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा सगळा किस्सा सचिन यांनी रंगवून सांगितला. किस्सा सांगितल्यानंतर त्यांनी कसेबसे आपले अश्रू आवरल्याचंही व्हिडीओत दिसतंय. 

आता सचिन यांनी कोणता किस्सा सांगितला आणि त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येणार नाहीत, असं शक्यच नाही. अनेकांनी कमेंट करत, सचिन यांची फिरकी घेण्याचा  प्रयत्न केला आहे. तर अनेकांनी सचिन यांचं कौतुकही केलंय. एका युजरनं म्हटलंय की, दादासाहेब फाळके यांना सचिन पिळगावकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं. तसेच, अनेकांनी विचारलंय की, ज्यावेळी राजकुमार बडजात्यांचं निधन झालं, त्यावेळी मोबाईल होते का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. याव्यतिरिक्त कमेंटमध्ये एका युजरनं म्हटलंय की, "हा माणूस नेहमी अशा लोकांबद्दल बोलतो की, जे हयात नाहीत. हयात व्यक्तींच्या सहसा नादी लागत नाही हा..."