Sharad Pawar Baramati Mcdonald's : अख्ख्या महाराष्ट्रात शरद पवारांची (Sharad Pawar) बारामती कायम चर्चेचा विषय असते. मात्र आता हीच बारामती (Baramati) आणखी एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. कारण बारामतीमध्ये मॅकडोनाल्डचे आऊटलेट (McDonald outlets in Baramati) सुरु झाले आहे. इरा पवार (Era Pawar) यांनी बारामतीमध्ये हे McDonald आऊलटलेट सुरु केलं आहे. दरम्यान, इरा पवार यांच्या McDonald आऊलटलेटच्या उद्घाटनाला पवार कुटुंबीय एकत्र जमल्याचे पाहायला मिळेल. अशातच या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील हजार असल्याचे बघायला मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत 'इरा पवार, तुझा खूप अभिमान आहे!' असे कॅपशन्स मध्ये लिहले आहे.

Continues below advertisement

Who Is Ira Pawar :  मॅकडी सुरु करणाऱ्या इरा पवार कोण?

दरम्यान, या उद्घाटन सोहळ्याला प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार असा सारा गोतावळा जमला होता. बारामतीत प्रथमच McDonald आऊलटलेट खुले झाले आहे. दरम्यान, बारामतीमधील पहिल्यावहिल्या McDonald आऊटले सुरु करणाऱ्या इरा पवार नेमक्या कोण? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. तर इरा पवार या आमदार रोहित पवार यांची चुलत बहीण आहे. म्हणजेच त्या राजेंद्र पवार यांचे बंधू रणजीत पवार यांच्या कन्या आहेत. तर शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचीही नातं आहे. या वेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही मॅक डीच्या आऊटलेटला भेट देऊन इरा पवार यांना शुभेच्छा दिल्या. नुकतेच सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील पहिल्यावहिल्या McDonald आऊटलेची पाहणी केली होती. त्यांनतर आता या आऊटलेटचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा