Dhurandhar Advance Booking: गेल्या कित्येक दिवसांपासून रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) फिल्म्सची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. तो त्याच्या उत्तम अभिनयानं सर्वांना प्रभावित करतो. 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमांमधून त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवून दिली. तसे, त्याचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे गाजले नाहीत. त्यामुळे सध्या त्याचा आगामी सिनेमा 'धुरंधर'कडून (Dhurandhar Movie) चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा सिनेमा 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या त्याची अॅडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटानं आधीच कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

Continues below advertisement

'धुरंधर'मध्ये अनेक प्रमुख कलाकार आहेत, ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जातंय आणि यामुळे वादही निर्माण झाला आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई

'धुरंधर'चं  अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालंय आणि ते आधीच चांगली कमाई करत आहेत. लोकांना हा चित्रपट खूप आवडलाय. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'धुरंधर'नं ब्लॉक सीट्ससह अॅडव्हान्स बुकिंगमधून आधीच 3.67 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 44,987 तिकिटं विकली गेली आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून दोन दिवस बाकी आहेत आणि या दोन दिवसांत, 'धुरंधर'ला अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी  कमाई होण्याची अपेक्षा आहे.                    

रिलीजपूर्वीच कित्येकांना पछाडलंय

रणवीर सिंह त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बनवलेला विक्रम मोडू शकतो. तसेच, हा सिनेमा सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटानं बनवलेला विक्रमही मोडू शकतो. 'सिकंदर'नं अॅडव्हान्स बुकिंगमधून 10.09 कोटी कमावले आहेत. आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटानं आधीच बनवलेला विक्रम मोडलाय.                       

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Award Winning Director Jafar Panahi Prison Sentence: इथे दिग्गज दिग्दर्शकाचा पुरस्कारानं सन्मान अन् तिकडे सुनावण्यात आली तुरुंगवासाची शिक्षा; नेमकं घडलं काय?