Sachin Pilgaonkar On PL. Deshpande: मराठी सिनेसृष्टीचे महागुरू (Mahaguru), अर्थात सचिन पिळगांवकर (Actor Sachin Pilgaonkar). दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमे केले. सिनेसृष्टीत मोठी कारकीर्द असलेल्या सचिन पिळगांवकरांनी आजवर अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्याती, इंडस्ट्रीतील अनेक किस्से सांगितले आहे. त्यांनी सांगितलेलं किस्से कायम चर्चेत असतात. अगदी गुरुदत्त, मधुबाला यांच्यापासून वसंत सबनीस यांसारख्या दिग्गजांच्या मुशीत तयार झालेल्या महागुरूंनी अनेक दिग्गजांसोबत कामंही केलंय. एवढंच काय तर, साक्षात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे (P L Deshpande)  यांचा सहवासही सचिन पिळगांवकरांना लाभला आहे. यासंदर्भातलाच किस्सा सचिन पिळगांवकरांनी सांगितला आहे. 

Continues below advertisement

पु. ल देशपांडे (Pu La Deshpande) यांनी मला विनोदाशी ओळख करुन दिली, असं सचिन पिळगांवकरांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं. हे सांगताना त्यांनी आपल्या बालपणीचा किस्सा एका कार्यक्रमात सांगितला होता. सध्या त्यांनी सांगितलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पुलंसोबतचा महागुरूंचा 'तो' किस्सा

काही वर्षांपूर्वी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर सहभागी झाले होते. तेव्हा, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना सचिन पिळगांवकरांनी पु. ल. देशपांडेंसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. याचा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

सचिन पिळगांवकर काय म्हणाले? 

सचिन पिळगांवकर म्हणालेले की, "पु. ल. हे पहिले होते ज्यांनी मला विनोदाशी ओळख करुन दिली. मी सात-आठ वर्षांचा होतो. मी वडिलांसोबत एका लग्नाला गेलो होतो. तिथे गेल्या गेल्याच समोर  पु.ल. उभे होते. बाबांनी त्यांना नमस्कार केला. मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'अरे सचिन, तू एकटा? बायको कुठेय?' मी सात-आठ वर्षांचाच होतो, त्यामुळे गांगरलो. मला कळेना मी काय बोलावं... बायको आणायला हवी होती का...? लग्नच नाही झालं माझं वगैरे वगैरे... या सगळ्या गोष्टी. ते माझ्याकडे बघून हसले आणि तेव्हा मला कळलं की, हा विनोद होता. विनोद हा असा निखळ असावा. म्हणजे, विनोद असावा तर तो दारासिंग सारखा असावा... म्हणजे, उघडा असला तरी सशक्त आणि निरोगी असावा..."

दरम्यान, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, डान्सर अशी बहुगुणी ओळख असलेले सचिन पिळगांवकर यांनी मराठी, हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत आपल्या कामाचा ठसा उमटवला. आजवर त्यांनी अनेक दिग्गजांसोबत काम केलंय. अनेकांच्या भेटी-गाठी घेतल्यात, मुळात त्यांचे वडील निर्माते असल्यामुळे त्याच्या घरातच सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उठ-बस असायची, असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे सचिन पिळगांवकर अगदी बालपणापासूनच दिग्गजांचा सहवास लाभला. यासंदर्भातले किस्से बऱ्याचदा ते मुलाखतींमधून ऐकवत असतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'सचिनसोबत माझी कधीच मैत्री नव्हती, त्याच्या...'; अशोक सराफ यांनी सगळंच स्पष्ट केलं