Supriya Pilgaonkar : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या या लाडक्या कपलने सध्या एका गोष्टीवर दिलेली प्रतिक्रिया सध्या बरीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या एका वक्तव्यामुळे संसदेत बराच गदारोळ देखील माजला होता. 


राज्यसभेत जया बच्चन यांचं नाव घेताना जगदीप धनखड जया अमिताभ बच्चन असं नाव घेतलं. त्यावर जया बच्चन यांनी देखील आक्षेप घेतला.  या मुद्द्यावरून जया आणि अध्यक्षांमध्ये यापूर्वी दोनदा वाद झालेत. या सगळ्यानंतर सुप्रिया पिळगांवकर यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर अगदी मुद्देसूद भाष्य केलं. 


'या गोष्टीचा मला खूप अभिमान'


संसाराला 40 वर्ष झाली तरीही आज तुम्हाला सचिन पिळगांवकरची बायको म्हणून ओळखतात या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता. त्यावर सुप्रिया पिळगांवकर यांनी म्हटलं की, 'तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला कधी सुप्रिया अशी हाक ऐकूच आली नाही. ती हाक नेहमीच सचिनची बायको अशीच हाक ऐकू आली आहे. मी मराठीत सुद्धा एवढं काम केलं आहे पण तरीही माझी ओळख ही सचिनची बायको अशीच आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. उलट मला खूप कौतुक आहे, या गोष्टीचं की ते मला सचिनची बायको म्हणूनच ओळखतात. इथे मला काही माझी वेगळी ओळख असं मला अजिबात वाटत नाही.' 


सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं की, 'आपल्या मराठी संस्कृतीमध्येच असं पूर्ण नाव घेतलं जातं. दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीमध्ये असं नाव घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांना आवडण्या किंवा न आवडण्यापेक्षा त्यांच्या संस्कारात बसतं की नाही हे पाहणंही महत्त्वाचं आहे.' 


दोनवेळा जयांच्या नावावरून वाद


जया यांच्या नावावरून पहिला वाद 29 जुलै रोजी झाला होता. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सभागृहात जया बच्चन यांना 'श्रीमती जया अमिताभ बच्चन जी' असे संबोधले. यावर जया उपसभापतींवर संतापल्या. त्या म्हणाल्या की, सर, फक्त जया बच्चन बोलले तर पुरे झाले. त्यावर उपसभापतींनीही उत्तर दिले की, येथे पूर्ण नाव लिहिले आहे, त्यामुळे मी ते पुन्हा सांगितले. त्याला उत्तर देताना जया म्हणाल्या - महिलांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जावे अशी ही नवीन गोष्ट सुरू झाली आहे. ते मुळीच अस्तित्वात नाहीत. त्याला स्वतःमध्ये कोणतेही यश नाही.


नावाचा दुसरा वाद 5 ऑगस्ट रोजी झाला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, पुरवणी क्रमांक 4, श्रीमती जया अमिताभ बच्चन… मग जया आपल्या जागेवरून उठल्या आणि म्हणाल्या, सर, तुम्हाला अमिताभचा अर्थ माहित आहे का? मला आमच्या लग्नाचा आणि माझ्या पतीच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. अध्यक्षांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले की, माननीय सदस्य, निवडणूक प्रमाणपत्रात दिसणारे नाव बदलण्याची प्रक्रिया आहे आणि ती येथे जमा केली आहे. या प्रक्रियेचा फायदा मी स्वतः 1989 मध्ये घेतला. बदलाची ती प्रक्रिया आम्ही प्रत्येक सदस्याला समजावून सांगितली आहे.


ही बातमी वाचा : 


Rinku Rajguru : आर्ची मॅडमच्या स्टोरीवरचा मिस्ट्री मॅन कोण? पोस्ट पाहून चाहत्यांना पडले प्रश्न