Sachin Goswami :  आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या वक्तव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव चर्चेत आलंय. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्तानेही पत्रकार परिषद घेत यासगळ्यावर भाष्य केलं. बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अनेक गंभीर आरोप सुरेश धस यांच्याकडून केले जात आहेत. यामध्ये त्यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली आहे. त्यामध्ये प्राजक्ता माळीचंही नाव आहे. यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी देखील पोस्ट करत यावर निषेध व्यक्त केला आहे. 


प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केलीये. तसेच धनंयज मुंडे यांच्यासोबत एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली होती आणि ती आयुष्यातील एकमेव भेट होती, असं स्पष्टीकरण प्राजक्ताने दिलं आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजलीये. प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देत माझं वक्तव्य पुन्हा ऐकावं असं म्हटलं होतं. पण त्यावरही प्राजक्ताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. 


सचिन गोस्वामी यांनी काय म्हटलं?


सचिन गोस्वामी यांनी प्राजक्तासाठी पोस्ट करत म्हटलं की, ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो.कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज  सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.


सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी - प्रााजक्ता माळी


बीडमध्ये पुरुष कलाकार कधी गेलेच नाहीत का? असा सवाल प्राजक्ताने तिच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. पुढे तिने म्हटलं की, तुम्ही महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर त्यांच्या कतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. यामधून तुमची मानसिकता कळते. त्यांनी माझी जाहीर माफी मागावी आणि केवळ माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचींही नावं त्यांनी घेतली आहेत, त्यांचीही जाहीर माफी त्यांनी मागावी. या प्रकरणी महिला आयोगात तक्रार केल्याचंही यावेळी प्राजक्ताने सांगितलं आहे.   



ही बातमी वाचा : 


Siddharth Jadhav : 'होऊ दे धिंगाणा'चे 100 भाग पूर्ण, सिद्धार्थ जाधवने भावुक होत मानले प्रेक्षकांचे आभार; म्हणाला...