Massive Accident on Thane Ghodbunder Road: ठाणे-घोडबंदर रोड म्हणजे वर्दळीचं ठिकाण. या रोडवर कायम वाहनांची रेलचेल सुरू असते. दरम्यान, ९ जानेवारी 2026 रोजी एक भीषण अपघात घडला. सकाळच्या सुमारास कामगारांची कामावर जाण्याची घाई असताना 14 वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचं प्रचंड नुकसानं झालं. रस्त्याची दुरावस्था, पोलिसांची अनुपस्थिति आणि रोजचं ट्रॅफिक जाम यामुळे अपघात झाला असल्याची शक्यता आहे. या अपघातामुळे ट्रॅफिक जामचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. या अपघातानंतर अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. तसेच सरकारवर टिका केली आहे. सध्या अभिनेत्रीनं अपघातास्थळावरचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

अपघात नेमका कसा घडला?

ही अपघाताची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे - घोडबंदर रोडवर सकाळच्या सुमारास 14 वाहने एकमेकांवर आदळली. माहितीनुसार, घोडबंदरहून काही अवजड वाहनं ठाण्याच्या दिशेनं येत होती. तसेच काही हलकी वाहनं विरूद्ध दिशेनं येत होती. काही वाहनांचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावर अपघात झाला. वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. यानंतर वाहतूक पोलिसांनी आणि नागरिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

दरम्यान, मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे, हिनं देखील या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओतून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. अभिनेत्रीनं या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे.  व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "हा अपघात विरूद्ध दिशेनं टाकल्यामुळे झाला आहे, असं म्हणत राज्य सरकारनं कृपया हात झटकू नये. या अपघातामागचं खरं कारण रस्त्याची दुरावस्था, ट्रॅफिक जाम आणि जागेवर ट्रॅफिक पोलीस नसणे आहे", असं अभिनेत्री म्हणाली.

या अपघातानंतर वाहनांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. काहींनी रूग्णालयात उपचार घेतले आहेत. अपघात घडताच गायमुख ते वसई खाडी पुलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या काचा पडल्या होत्या. या अपघातानंतर या मार्गावरील प्रवास टाळण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केलं.  सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.