Nagpur Municipal Corporation Election 2026 :  'एक पव्वा दटाओ और गरीबी हटाओ..., मेरा भारत महान, हमे दो, देशी दारू दुका...; अशा आपल्या खास शैलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसवर(Congress) सडकूनटीकाकेली. सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आजवर गरिबांसाठी काय केलं? असा प्रश्नही विचारला आहे. नागपूरच्या वाठोडा परिसरात शुक्रवारी नितीन गडकरी यांची प्रचार सभा झाली. यावेळी गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस नेत्यांनी फक्त आपल्या स्वतःसाठी शिक्षण संस्था उभारल्या आणि गरिबांची लूट केली, असा आरोप केला. 'शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही...काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हीच रोजगार हमी' अशी खिल्लीही गडकरी यांनी यावेळी उडवली. मात्र, शिक्षण सम्राट बनलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना गडकरींनी राष्ट्रवादीचा एक मोठा भाग आपल्या सोबत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सावरून घेतलं. शिवाय सध्या आमच्या सोबत असलेली राष्ट्रवादी तशी नाही हे सांगायलाही गडकरी मात्र विसरले नाही.

Continues below advertisement

Nitin Gadkari : नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या कमबॅकसाठी नितीन गडकरींकडून जोरदार प्रचार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या कमबॅकसाठी जोरदार प्रचार करत आहेत. गडकरींनी शुक्रवारी वाठोडा, शांतीनगर आणि कळमना भागात तीन प्रचार सभा घेतल्या. तर आजही गडकरी यांच्या गिट्टीखदान, फुटाळा आणि नारा या भागात तीन प्रचार सभा होणार आहेत. आपल्या प्रचार सभांच्या माध्यमातून नितीन गडकरी गेल्या तीन टर्म मधील भाजपच्या महानगरपालिकेतील सत्तेत शहरात कोणकोणते कामे केले. तसेच त्यांच्या विभागाने शहरात रस्ते आणि उड्डाणपूलांच्या माध्यमातून कसा विकास घडवला. येणाऱ्या काळात भाजप महापालिकेत पुन्हा सत्तेत आल्यावर कोणकोणती कामे केली जाईल याचा ब्लू प्रिंट नागपूरकर मतदारांपुढेमांडत आहे. यावेळीप्रचारसभेतबोलताना खासदाराच्या पोटी खासदार आणि नगरसेवकांच्या पोटी नगरसेवक जन्माला येणार नाही. नगरसेवक जनता आणि कार्यकर्त्यांमधून जन्माला यायला हवं असेही गडकरी म्हणाले.

Continues below advertisement

Nagpur Election 2026: नागपूर महानगर पालिकेसाठी भाजपकडूनआज जाहीरनामा होणार प्रसिद्ध

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून नागपूर महानगर पालिकेसाठी आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शहर अध्यक्ष दयशंकर तिवरी यांच्या हस्ते हा जाहीरनामाप्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून जाहीरनामा तयार होते वेळी जनतेतून पण मत मागितली होती. जनतेच्या मागण्याचा व त्यांच्या मतांचा समावेश या जाहिरनाम्यात असणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या