Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भेट दिली आहे. यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रूपाली चाकणकर यांचं ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये बारामतीत जोरदार स्वागत केलं. दरम्यान, यावेळी मराठी बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण, रुपाली चाकणकर आणि कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा एकत्रित रोड शो पाहायला मिळाला.
अजित पवारांकडून सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचा शब्द
अभिनेता सूरज चव्हाण मराठी बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवारांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. दरम्यानच्या काळात सूरज चव्हाणच्या घराचं देखील काम सुरु झालं. अजित पवार यांनी घराचं थोडं काम पूर्ण झाल्यानंतर पाहाणी केली होती. मात्र, यावेळी सूरज चव्हाण तिथे उपस्थित नव्हता. अजित पवार घराची पाहणी करुन त्यांच्या पुढील कामांसाठी रवाना झाले होते.
सूरज चव्हाणचा झापूक झुपूक सिनेमा ठरला फ्लॉप
सूरज चव्हाण मराठी बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्यासोबत नवा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या सिनेमाला म्हणावे असे यश मिळाले नाही. त्याचा हा सिनेमा फ्लॉप ठरला असंच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे बिग बॉसमधील त्याच्या अनेक मित्रांनी या सिनेमाला प्रमोट केलं होतं. मात्र, त्याच्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सैय्याराची चर्चा सुरु असतानाच बॉबी देओलच्या सिनेमाची छप्परफाड कमाई, 2 दिवसांत मोठे विक्रम मोडले
1.5 कोटीचं बजेट अन् सिनेमाने कमावले होते 19 कोटी, शूटिंगवेळी दिग्दर्शक पालखीत बसून यायचा