hari hara veera mallu box office collection day 2 : अभिनेता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिकेत असलेला मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केलेला "सैय्यारा" या चित्रपटाला आठव्या दिवशीसुद्धा प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. मात्र या चित्रपटाच्या चर्चेच्या दरम्यान पवन कल्याणने "हरि हर वीरा मल्लू" या चित्रपटाद्वारे सिल्व्हर स्क्रीनवर दमदार पुनरागमन केलं आहे, ज्यामध्ये बॉबी देओलही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतो आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 44 कोटींची ओपनिंग घेतली, तर दुसऱ्या दिवशीसुद्धा "हरि हर वीरा मल्लू" चा गडगडाट बॉक्स ऑफिसवर ऐकायला मिळतो आहे.
hari hara veera mallu ची दुसऱ्या दिवशी किती कमाई?
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "हरि हर वीरा मल्लू" दुसऱ्या दिवशी सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई करू शकतो, ज्यामुळे भारतात एकूण कमाई 60 ते 65 कोटींपर्यंत पोहोचू शकते. पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. मात्र अद्याप चित्रपटाला आपल्या बजेटची भरपाई करण्यासाठी 300 कोटींचा आकडा पार करावा लागेल.
"हरि हर वीरा मल्लू" हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, ज्यामध्ये पवन कल्याण आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील प्रेक्षकांचं लक्ष या चित्रपटाकडे वेधलं जात आहे. तरीही "जेलर" किंवा "कल्कि 2898 ए.डी." यासारखा क्रेझ या चित्रपटाला लाभलेला नाही. गौरवाची बाब म्हणजे पवन कल्याणच्या "हरि हर वीरा मल्लू" ने बॉक्स ऑफिसवर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग दिली आहे.
hari hara veera mallu सिनेमाची स्टोरी नेमकी काय?
या सिनेमाची स्टोरी 17 व्या शतकातील मुघल साम्राज्यावर आहे. वीर मल्लू या योद्ध्याची. वीर मल्लू याच्यावर मुघल साम्राज्याच्या वेढ्यात सापडलेल्या एका शहराला वाचवण्यासाठी कोहिनूर हिरा शोधण्याचे काम सोपवले जाते. या चित्रपटात पवन कल्याण यांच्या प्रमुख भूमिकेशिवाय बॉबी देओल, निधी अग्रवाल आणि सथ्याराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उल्लू, अल्ट बालाजीसह बोल्ड कंटेट दाखवणाऱ्या 25 APP वर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय