Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात रुचिता जामदार घरातून बाहेर पडली. तिच्या अचानक झालेल्या EXIT ने घरातील सदस्यांसह तिच्या चाहत्यांना मोठं धक्का बसलाय. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर ती सध्या अनेक ठिकाणी मुलाखती देताना आणि जवळच्या लोकांना भेटताना दिसतं आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून रुचिताचे घरातील जवळपास सगळ्यांशीच वाद झालेले. विशाल आणि रुचीतामध्ये सुरुवातीला टशन दिसली. नंतर दोघांमध्ये खास नातं तयार झालं. दोघांमध्ये प्रेम असल्याच्या चर्चा झाल्या. दोघांनीही घरात ते एकमेकांना आवडत असल्याची कबुलीही दिलेली. रुचिता घराबाहेर पडल्यानंतर विशाल धायमोकलून रडल्याचं दिसलं. दोघांमध्ये खरंच प्रेम होतं का? असा प्रश्न तिला घराबाहेर पडल्यानंतर विचारला जातोय. त्यावर रुचिताने स्पष्टच उत्तर देताना दिसलीय. आमच्यात कधीच प्रेम नव्हतं असं म्हणत तिने हे नरेटिव्ह घरात अनेकांनी सेट केल्याचं तिने म्हटलंय.
नेमकं काय म्हणाली रुचिता?
रुचिता म्हणाली, " आमच्यात खरंच love angle नव्हता. आम्ही अनेकदा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण हे घराबाहेर एकदाच आलं. जेंव्हा दीपाली ती म्हणाली की रुचिता विशालमध्ये वाहत जात आहे. ती प्रेमात पडलीय. मी बोलले हे प्रेम वगैरे काही नाहीय. आमच्यात फक्त भावनिक बंध, निष्ठा होती. आंधळा विश्वास आहे. तोः माणूस माझ्यासाठी डे 1 पासून होता. मीही त्याच्यासाठी होते. आणि जेंव्हा असं होतं ना की आख्खं घर तुमच्या विरोधान असत तेंव्हा आपणच एकमेकांसाठी असतो. तेंव्हा ते कनेक्शन इतक्या वेगळ्या लेवलवर जातं आणि खोल जातं ना की मग ते तोडणं फार अवघड होतं. त्यात एक खूप Genuine होतं. ती फार वेगळी मैत्री होती. त्यामध्ये कधीच रोमॅण्टिक भावना नव्हत्या . हे मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला ."
'आम्ही एकमेकांना सांगितलं की तू मला आवडतो - मी तुला आवडते. माणूस म्हणून आवडतो. पण ते खूप विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने पुढे आलं. राखी आली तिने खूप वेगळ्या पद्धतीने नरेटिव सेट केलं . मग तसेच नरेटिव सेट होत राहिले. कशाचं भूमिका बनत गेले. त्यावरून मी बरीच ट्रोल झाले. आमच्यातील वयाचा जो गॅप आहे त्यातून काहीच बनू शकत नाही. त्याच्या आयुष्यात वेगळे प्रायोरिटीज आहेत. माझ्या आयुष्यात वेगळे आहेत. आमच्या दोघांची जगण्याची पद्धत फार वेगळी आहे. आमच्यात काहीच एक सारख्या गोष्टी नाहीत. हो पण खूप खरी मैत्री आहे. मला असं वाटत नाही तर घरात विशाल पेक्षा जास्त खरी मैत्री माझी कोणाशी झाली असेल. " असं रुचिता म्हणाली.
यावर चाहत्यांनी कमेंट्स करत रुचीताला ट्रोल केल्याचंही दिसलं. रुचिता बाहेर येऊन पलटली असं काही जण म्हणतायत. काहींनी विशाल घराबाहेर आल्यानंतर शुभविवाह होणार अशी अटकळ बांधली आहे.
