Hardik Pandya And Gf Mahika Sharma Video: न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. यावेळी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्यांची गर्लफ्रेंड महिका शर्माने (Mahika Sharma) सगळ्यांचं लक्ष वेधले. विश्वचषक जिंकल्यानंतर महिका हार्दिक पांड्यासोबत मैदानात दिसली.
हार्दिक पांड्या आणि महिका दोघंचं मैदानात फिरत होते, नाचत होते. महिकाने यावेळी हार्दिक पांड्याला अनेकदा मिठी मारली. तसेच हार्दिकच्या गालावर किसही केली. महिकाने जेव्हा हार्दिक पांड्याला किस केली, त्यावेळी मैदानातील ग्राऊंड स्टाफ दोघांकडे बघत बसले. तसेच हार्दिक आणि महिकाचे आणखी काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याच्या खांद्यावर तिरंगा, तर गळ्यात विश्वचषकाचं मेडल असून यावेळी तो महिकासोबत मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक आणि महिकाच्या या कृत्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. (Hardik Pandya And Gf Mahika Video)
कोण आहे महिका शर्मा?- (Who Is Hardik Pandya GF Mahika Sharma)
महिका शर्मा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. माहिका शर्मा इंस्टाग्रामवर फॅशन आणि फिटनेस कंटेंट शेअर करते. महिकाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आणि नंतर अर्थशास्त्र आणि वित्त शिक्षण घेतले. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, महिकाने अनेक इंटर्नशिप केल्या, ज्यामुळे तिला मॉडेलिंग आणि अभिनय करायला सुरुवात झाली. महिकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात फ्रीलांसर म्हणून केली. ती रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये अनेक छोट्या भूमिका केल्या, ज्यात "इनटू द डस्क" भाष्य आणि ओमंग कुमारचा चित्रपट "पीएम नरेंद्र मोदी" (2019) यांचा समावेश आहे. महिका अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. महिकाने तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि अमित अग्रवाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी वॉक केला आहे. 24 वर्षीय महिका शर्माला 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज) पुरस्कार देखील मिळाला.
