Rohit Shetty Firing Case update: दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर रविवारी गोळीबाराचा प्रकार घडला. यानंतर मुंबईसह  सिनेविश्वात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  दरम्यान, अवघ्या 24 तासांत या प्रकरणाच्या संबंधित अनेक धागेदोरे सापडले आहेत. या प्रकरणाचा थेट कनेक्शन अकोल्याशी असल्याचं तपासातून उघड  झालं आहे. या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी बिश्नोई टोळीनं स्वीकारल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा पोस्टमधून रोहित शेट्टीला धमकी देण्यात आली आहे. हा गोळीबार फक्त ट्रेलर आहे, असं त्या पोस्टमध्ये  नमूद करण्यात आलं आहे.

रोहित शेट्टी प्रकरणाचं अकोल्याशी कनेक्शन काय?

 

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात शुभम लोणकर यांचं नाव समोर आलं आहे.  शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर याआधीही पोलिसांनी कारवाई केली आहे.  बंदूक तस्करी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. अकोला पोलिसांनी त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केली होती.  दरम्यान, तो लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्याही संपर्कात  असल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम लोणकर आणि बिश्नोई गँगमध्ये संवाद झाला आहे का? यासाठी त्यांच्यातील कॉल आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग तपास यंत्रणेकडे पाठवण्यात आली आहे. सध्या  तपासात नेमकं काय समोर येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात नेमका कुणाचा हात आहे? याची माहिती लवकरच उघड होईल.  दरम्यान, अकोला कनेक्शनमुळे या प्रकरणाला नवीन मिळण्याची शक्यता आहे. 

रविवारी नेमकं काय घडलं?

1 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शत रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर गोळीबाराचा प्रकार घडला.  या घटनेनंतर रोहित शेट्टीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच घरात कुटुंब आणि मित्रांना  न येण्याची विनंती केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून,  सध्या त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  शुभम लोणकर या आरोपीचा तपास सुरू आहे.