Gold rate Silver rate today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री भारतावर लादण्यात आलेला आयात कर (tariff) कमी करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी उसळी पाहायला मिळाली. आज सकाळी भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) 2200 आणि निफ्टी 700 अंकांनी वधारला. अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद भांडवली बाजारात उमटले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे सोने आणि चांदीचे भावही वाढले आहेत. (India Us Trade deal)
सध्याच्या दरानुसार, आज सकाळी वायदा बाजार उघडल्यानंतर (Commodity Marke) एक किलो चांदीचा दर (Silver rates) तब्बल 20 हजारांच्या आसपास वाढला होता. त्यामुळे एक किलो चांदीचा दर अडीच लाखांच्या पार गेला. तर गेल्या काही दिवसांत भावात प्रचंड चढउतार झाल्याने चर्चेत असलेल्या सोन्याचा भावही (Gold rates) आज वधारला आहे. आज बाजार उघडताच सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल साडेचार हजार रुपयांनी वधारला. यामुळे सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 48 हजार रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.
India Us trade deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे नक्की काय घडलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी रात्री ट्विटवरवरुन भारतावरील कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. "आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलणे खूप छान वाटले. मेड इन इंडिया उत्पादनांवर आता 18% शुल्क आकारले जाईल याचा आनंद झाला. या अद्भुत घोषणेबद्दल भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खूप खूप आभार," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Us tariff cut down India: व्यापार करारात विरोधाभास काय?
* ट्रम्प म्हणाले, व्यापार करारावर सहमती, मोदींकडून व्यापार कराराचा उल्लेख नाही फक्त टॅरिफ 18% केले त्याबद्दल आभार
* ट्रम्प म्हणाले,भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, मोदींच्या ट्विटमध्ये तसा उल्लेख नाही
* ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकेकडून अर्थात व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, मोदींच्या ट्विटमध्ये याचाही उल्लेख नाही
* ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकन मालावर टॅरिफ शून्य टक्क्यांपर्यंत नेईल, मोदींच्या ट्विटमध्ये उल्लेख नाही
* ट्रम्प म्हणाले, भारत व्यापारातले अडथळे दूर करेल, मोदींच्या ट्विटमध्ये चकार उल्लेख नाही
* ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकेकडून ऊर्जा,तंत्रज्ञान,कृषी,कोळसा प्राधान्याने खरेदी करेल, (मोदींकडून अजिबात दुजोरा नाही)
आणखी वाचा