Horoscope Today 23 April 2024 : पंचांगानुसार, आज 23 एप्रिल 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज हनुमान जयंतीचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
23 एप्रिल 2024 राशीभविष्य (Horoscope Today 23 April 2024)
मेष रास (Aries Horoscope Today)
आजच्या दिवसाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आनंदी असेल, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही तुमच्या कपाळावर आठ्या दिसणार नाहीत.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज भाग्याची साथ चांगली मिळणार आहे. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कोणत्याही नवीन योजना अंमलात आणायची घाई करू नका. नोकरी धंद्याच्या ठिकाणी अचानक कामे मिळणे अथवा जाणे काही गोंधळ निर्माण होणे अशा शक्यता आहेत.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
भावंडांशी थोडे मतभेद संभवतात. प्रवासाचे योग येतील. आजचा दिवस तुमच्या पराक्रमाला ऊर्जा देणारा ठरेल.
सिंह (Leo Horoscope Today)
महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा. नोकरी धंद्यात आपल्याबरोबरचे लोक पुढे जात आहेत आणि आपण मात्र आहोत तिथेच आहोत असा थोडासा अनुभव येईल.
कन्या (Virgo Horoscope Today)
थोडी चिडचिड झाली तरी चिकाटी आणि स्थिरता या गुणांच्या जोरावर पुढे जाणार आहात. नव्या उमेदीने कामाला लागाल.
तूळ (Libra Horoscope Today)
स्थावर इस्टेटच्या प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडेल. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी पथ्य पाणी सांभाळावे. महिलांनी त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
नोकरी धंद्याच्या ठिकाणी जरा जास्तच कष्ट पडतील. वरिष्ठांनी आश्वासन दिले तरी ते लगेच पूर्ण होणार नसल्याने त्यात फारसा रस तुम्ही घेणार नाही.
धनु (Sagittarius Horoscope Today)
तुम्ही जेथे काम करता तेथे अचानक काही बदल संभवतात. अशावेळी तुमच्याशिवाय त्यांचे काही चालणार नाही. महिलांनी आपला दृष्टिकोन बदलायला हवा.
मकर (Capricorn Horoscope Today)
आर्थिक गोष्टींमध्ये थोडी अनिश्चितता दाखवते. मित्रमंडळींशी भांडणाचे प्रसंग उद्भवतात. महिला अति व्यवहारी बनतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
घरात आणि घराबाहेर व्यवहाराने वागाल. भावना गुंडाळून ठेवून निर्णय घ्याल. महिलांनी संयम राखणे महत्त्वाचे ठरेल.
मीन (Pisces Horoscope Today)
आज दुसऱ्याला स्वातंत्र्य देताना हात थोडा आखडताच घ्याल. स्वतःचा विचार जरा जास्तच कराल. महिलांची सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं; होतील विपरीत परिणाम