RJ Mahvash Video: क्रिकेटर युजवेंद्र चहल (Cricketer Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. अशातच एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असूनही दुसरीकडे युझी चहल नवनव्या मिस्ट्री गर्ल्ससोबत स्पॉट होत असतो. अशातच काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता, जिचं नाव आरजे महावश (RJ Mahvash). तेव्हापासूनच दोघांच्या चर्चा रंगल्या असून दोघांचेही सोशल मीडिया (Social Media) प्रोफाईल्स नेटकऱ्यांकडून स्टॉक केले जातात. अशातच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या आरजे महावशनं बॉयफ्रेंडबाबत एक कमेंट केली आहे आणि युजवेंद्र चहलनं ती कमेंट लाईक केली आहे. नेमकं हेच नेटकऱ्यांनी हेरलं आणि यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. 

आरजे महावश सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहते तिनं शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवर नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. सध्या आरजे महावश तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सध्या महावशचं नाव युजवेंद्र चहलसोबत जोडलं जात आहे. दरम्यान, दोघांनीही अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, आरजे महावशच्या एका सोशल मीडिया पोस्टनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

आरजे महावशचं 'ती' पोस्ट नेमकी काय? 

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये आरजे महावशनं म्हटलंय की, "जर माझ्या आयुष्यात कोणताही मुलगा आला तर, तो फक्त एकच असेल. तोच माझा मित्र असेल, तोच माझा बेस्टफ्रेंड असेल, तोच बॉयफ्रेंड असेल आणि तोच माझा नवरा असेल, माझं आयुष्य त्याच्याच भोवती फिरू लागेल. मला खोटे मित्र नकोत, तशीही इतर मुलं माझ्या नादाला लागत नाही, माझा वाला... पुरेसा आहे. तोच सगळंकाही असेल..." 

आरजे महावशनं सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय की, "एक दिवस माझा बॉयफ्रेंड असेल आणि मला तुम्हा सर्वांकडे दुर्लक्ष करावं लागेल."

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस 

आरजे महावशनं पोस्ट केल्यानंतर युजवेंद्रनं पोस्ट लाईक केली. त्यानंतर युजर्सनी कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजरनं लिहिलंय की, युझीभाई येतंच असेल, हिचा इशारा समजला का? आमची पुढची वहिनी तूच असणार आहेस ना? तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, युझीभाईचं लाईक एवढ्या लवकर कसं येतं? फक्त आणि फक्त 15 सेकंदांतच लाईक केलंय युजवेंद्रनं. पुढे एका युजरनं लिहिलंय की, युझीभाईला सांगून पोस्ट करतेस, म्हणून फटाफट लाईक येतं.  

दरम्यान, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. दोघांनी आपसी सहमतीनं आपल्या चार वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड केला. आतापर्यंत घटस्फोटाची अनेक कारणं समोर आली आहेत. पण, अजूनही युजवेंद्र आणि धनश्रीनं यासंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.