Horoscope Today 03 April 2025: पंचांगानुसार, आज 03 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार गुरूवार. आज एप्रिल महिन्याचा तिसरा खास दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज चिकाटी आणि स्थिरता या गुणांच्या जोरावर अडचणीचा जास्त विचार करणार नाही, नव्या उमेदीने कामाला लागाल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडेल, कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी पथ्य पाणी सांभाळावे 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्याच्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतील, तेथे अचानक काही बदल संभवतात 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज वरिष्ठांनी आश्वासन दिले तरी ते लगेच पूर्ण होणार नसल्याने, त्यात फारसा रस तुम्ही घेणार नाही  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी तुमच्याशिवाय काही चालणार नाही. महिलांनी त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज आर्थिक गोष्टींमध्ये थोडी अनिश्चितता दाखवते, मित्रमंडळीशी भांडणाचे प्रसंग उदभवतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर तुमच्याकडून एक प्रकारची व्यावहारिक बैठक घातलेली तुम्हाला जाणवेल, भावना गुंडाळून ठेवून कठोर निर्णय घ्याल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या मुलांच्या हट्टीपणामुळे त्रास होऊ शकतो, दुसऱ्याला स्वातंत्र्य देताना हात थोडा आखडताच घ्याल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज स्वतःचा विचार जरा जास्तच कराल, सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड चालू राहील.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी वादविवाद संभवतात, कोणतीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमची मते घरातील लोकांना न पटल्यामुळे वाद होतील, थोडा ताण वाढेल आणि मानसिक स्वास्थ्य गमावून बसाल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावना प्रकट करताना संयम राखावा, तुमच्या वागण्या बोलण्यात संघर्षाचा प्रतिकारचा भाग जास्त असेल.

हेही वाचा>>

Numerology: मागील जन्माचे ऋण असते 'या' जन्मतारखेच्या लोकांवर? यश उशिराने मिळते, मग पैसाच पैसा, अंकशास्त्रात म्हटलंय...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)