मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला पन्नास दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून मुंबई पोलीस या प्रकरणांमध्ये तपास करत होते. मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करत सुशांत सिंहचे वडील कृष्ण कुमार सिंह यांनी बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात संदर्भात रिया चक्रवर्ती आणि इतर सहा लोकांन विरोधात गुन्हा नोंदवला. तर ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा नोंदवत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे ज्यासाठी उद्या रिया चक्रवर्तीला ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.


14 जूनला सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांनी एडीआर दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पन्नास दिवस झाले 56 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात काही ठोस निष्पन्न झालं नाही आणि म्हणूनच सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्ण कुमार सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त केले. सुशांत सिंहच्या आत्महत्येमागे व्यवसायिक वैमनस्य तर नाही ना या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आपला तपास पुढे नेला. बॉलीवुड मधील नामवंत व्यक्तींची चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली पण मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.


दोन आठवड्यापूर्वी सुशांत सिंह यांच्या वडिलांनी बिहारमध्ये सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासंदर्भात गुन्हा नोंदवला. यामध्ये सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि इतर सहा जणांवर आरोप लावत चौकशीची मागणी केली. बिहारमध्ये गुन्हा दाखल होताच बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.


बिहार पोलिसांचे लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या होती. सुशांतने कोणाकडून पैसे घेतले होते का त्याची आर्थिक बाजू कशी होती? त्याचे आर्थिक व्यवहार कोण बघायचं? या सगळ्या प्रश्नांपासून बिहार पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली. या तपासामध्ये बिहार पोलिसांना सर्वात महत्त्वाचं नाव समोर आल ते रिया चक्रवर्तीचं. रिया आणि सुशांत यांच फक्त एकमेकांनवर प्रेम होतं पण त्यांचा एकत्र व्यवसाय सुद्धा होता. ज्यामध्ये काही मोठ्या आर्थिक उलाढाली बिहार पोलिसांना आढळल्या. या आर्थिक उलढालीसंदर्भात ईडीने सुद्धा मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला.17 ते 18 कोटी रुपये सुशांतच्या अकाऊंटमधून काढल्याचं निष्पन्न झालं.


याच प्रकरणांमध्ये ईडीकडून काल रिया चक्रवर्तीच्या सीएची चौकशी करण्यात आली. तर दोन दिवसांपूर्वी सुशांतच्या सीएची चौकशी केली. रिया चक्रवर्तीच्या सीएकडून ईडीला रिया चक्रवर्तीच्या प्रॉपर्टी संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत ईडीच्या तपासात रिया हिने फ्लॅट मध्ये पैसे गुंतवले असल्याचं उघडकीस आलं आहे. रियाचे दोन फ्लॅट असल्याचं उघडकीस आलं आहे. एक फ्लॅट नवी मुंबई येथील उलवे येथे आहे . हा फ्लॅट रियाने आपल्या वडिलांच्या नावावर घेतला आहे. तर एक फ्लॅट खार येथे आहे. हा फ्लॅट स्वतः रियाच्या नावावर आहे. या फ्लॅटच्या व्यवहाराबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. या फ्लॅटच्या व्यवहाराची कागदपत्र ईडीचे अधिकारी तपासत आहेत.


रियाला उद्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजवण्यात आलं आहे. उद्या रिया चक्रवर्ती ची तिकडून चौकशी होणार आहे.


संबंधित बातम्या :