Riteish Deshmukhs Raja Shivaji trailer is finally out: रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.  पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली होती. महाराष्ट्राचे  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची गाथा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, आज या ऐतिहासिक सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमातून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील चेहरे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Raja Shivaji movie trailer release)

'राजा शिवाजी' चित्रपटातून रितेश देशमुखच्या मुलाची सिनेसृष्टीत एन्ट्री (Riteish Deshmukh presents the powerful trailer of Raja Shivaji)

रितेश विलासराव देशमुखने 'राजा शिवाजी' या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरमध्ये रितेश देशमुखच्या लहान मुलानं यात बाळ शिवाजी यांची  भूमिका साकारली आहे.  याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये दिसते. रितेश देशमुखच्या मुलानं या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याच्या अभिनयाचेही विशेष कौतुक होत आहे.  'मराठे मातीत गाडले जात नाही, ते पेरले जातात...'  यांसह अनेक लक्षवेधी संवाद (Dialogues) ट्रेलरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 

Continues below advertisement

राजा शिवाजी चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी (Raja Shivaji Trailer Launch)

 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर 20 एप्रिल रोजी मुंबईतील  एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला होता.   या सिनेमात रितेश देशमुख व्यतिरिक्त  जेनिलिया देशमुख, विद्या बालन, अभिषेक बच्चन,  सचिन खेडेकर, संजय दत्त, बोमण इरानी, भाग्यश्री, फरदीन खान,  जितेंद्र जोशी,  महेश मांजरेकर यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी एकत्र आली आहे.  या ऐतिहासिक सिनेमाचे लेखन, निर्माते आणि दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे.   जिओ स्टुडिओज  प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख  निर्मित हा भव्य  ऐतिहासिक सिनेमा 1 मे 2025 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'...नाही तर, मीच जिंकलो असतो'; बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विशाल कोटियन काय म्हणाला?

महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक