Raja Shivaji Box Office Collection Day 27: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम कामगिरी करत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन चौथा आठवडा (Entertainment) सुरू झाला, तरीही या सिनेमाची घौडदौड कमी झालेली नाही. दरम्यान, शोज जरी असले तरी, या सिनेमाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली आहे. तरीही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातून या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 26 दिवसांपर्यंत या सिनेमाच्या कमाईत वाढ होत गेली. दरम्यान, 27 व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचा गल्ला जमवला? जाणून घेऊयात.
'राजा शिवाजी' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती कायम (Raja Shivaji Continues Strong Box Office Run)
मे महिन्याच्या सुरुवातीला सिनेमागृहात अनेक चित्रपट रिलीज झाले होते. 1 मे रोजी 'राजा शिवाजी' हा सिनेमा देखील रिलीज झाला होता. अनेक नवीन चित्रपट रिलीज होत असतानाही 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यासाठी यशस्वी ठरत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असल्याकारणाने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे रितेश देशमुख व्यतिरिक्त या सिनेमात इतर बॉलिवूड कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामुळेही हा सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला.
चौथा आठवडा सुरू झाला तरीही या सिनेमाची क्रेझ काही थांबलेली नाही. फिल्मच्या कलेक्शनबाबतीत बोलायचं झाल्यास, या सिनेमाने 27 दिवसांत बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली आहे. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'राजा शिवाजी' या सिनेमानं 27 व्या दिवशी 40 लाख रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.
पहिल्या आठवड्यात या सिनेमानं 52.65 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमानं 24 कोटींचा गल्ला जमवला. तर, तिसऱ्या आठवड्यात या सिनेमानं 12 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच 'राजा शिवाजी' या सिनेमानं एकूण 27 दिवसांत 93.30 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. परदेशातही 'राजा शिवाजी' या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम रिस्पोन्स मिळाला आहे. या चित्रपटाने परदेशात 4.22 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. माहितीनुसार, वर्ल्डवाइड या सिनेमानं आतापर्यंत 114.49 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
सलमान खानकडून फॅन्सना खास गिफ्ट; आगामी सिनेमाचं हृदयस्पर्शी गाणं रिलीज, VIDEOपाहून चाहते भारावले
ABP माझाच्या बातम्या LIVE...
