Raja Shivaji advance booking Marathi movie:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमात मराठी सिनेृष्टीसह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. हा सिनेमा 1 मे रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वीच या सिनेमाची दमदार सुरुवात झाली आहे. 'राजा शिवाजी' या सिनेमाची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे. येत्या काळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, यात काही शंका नाही.
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद (Riteish Deshmukhs Raja Shivaji’ gains massive attention as advance booking begins)
'राजा शिवाजी' हा सिनेमा गेल्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. या मल्टी स्टारर चित्रपटात रितेशने केवळ अभिनय केला नाही तर, दिग्दर्शनही केलं आहे. फिल्म मेकर्सने नुकतंच या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर रिलीज होताच, क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू (Raja Shivaji advance booking)
'राजा शिवाजी' हा सिनेमा कधी रिलीज होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहे. दरम्यान, ट्रेड विश्लेषक तरुण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, ''राजा शिवाजी' या सिनेमाच्या मराठी एडिशनसाठी आजपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे', चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता पाहता, या सिनेमाची बंपर अॅडव्हान्स बुकिंग होईल यात शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
