May Grah Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिना (May 2026) अवघ्या काही दिवसांतच सुरु होणार आहे. हा महिना फार खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. या ग्रहांच्या संक्रमणाने अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील.
खरंतर, मे महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 मे 2026 रोजी बुध ग्रह मेष राशीत अस्त होणार आहे. त्यानंतर 11 मे रोजी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. 14 मे रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. तर, 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मे महिन्याच्या शेवटी 26 मे रोजी बुध ग्रह पुन्हा उदित होणार आहे.
ग्रहांच्या स्थितीत झालेल्या बदलामुळे अनेक महत्त्वाचे राजयोग निर्माण होणार आहेत. 2 मे रोजी रुचक राजयोग निर्माण होईल. त्यानंतर 11 मे रोजी शुक्र आणि गुरु ग्रहाच्या संयोगाने द्विद्वादश राजयोग निर्माण होईल. 14 मे रोजी गुरु-शुक्र ग्रहाच्या युतीने गजलक्ष्मी आणि विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे याचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना फार खास असणार आहे. या काळात मंगळ ग्रहाचा तुमच्यावर मजबूत प्रभाव असेल. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, धनसंपत्तीत चांगली भरभराट होईल. करिअरच्या बाबतीत असलेल्या समस्या संपतील. तसेच, घरात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. गुंतवणुकीसाठी हा काळ लाभदायी असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळेल. या काळात तुम्ही चांगल्या कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, भविष्यासाठी अनेक नवीन योजना राबवू शकता. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान टिकून राहील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी मे महिना सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवे सोर्स निर्माण होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
