Riteish Deshmukh Slams Ruchita Jadhav in Bhaucha Dhakka Episode: बिग बॉस मराठी सहाव्या सिझनमध्ये रंगत आली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांचे नवे रंग पाहायला मिळतात. आठवड्यातील शेवटच्या दिवशी भाऊच्या धक्क्यामध्ये स्पर्धकांची कानउघडणी केली जाते. आठवडाभरात स्पर्धक नेमकं काय काय करतात? स्पर्धकांकडून झालेल्या चुकांचा पाढा रितेश देशमुख सर्वांसमोर वाचतात. भाऊच्या धक्क्यावर कधी मौज मस्ती तर, कधी स्पर्धकांचं कौतुक केलं जातं. तर, कधी वाईट वागणुकीवर चांगलंच सुनावलंही जातं. आतापर्यंत चार भाऊच्या धक्क्याचे एपिसोड्स झाले. पाचव्या एपिसोडमध्ये रितेश देशमुख भडकलेला दिसला. त्यानं रुचिताला चांगल्याच शब्दांत सुनावलं. सध्या बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
भाऊच्या धक्क्याचा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख प्रचंड संतापलेला दिसतो आहे. रुचिता जामदारला रितेश देशमुखने चांगलंच झापलं. एका एपिसोडमध्ये रुचिता जामदारनं दिपाली सय्यदसमोर 'आ थू' असं केलं. याच कारणास्तव रितेश देशमुख भडकले. त्यानं रुचिताला चांगलंच झापलं. रितेश देशमुख बोलत असताना रुचिता मध्येच बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रितेश देशमुख संतापतो. तसेच तिला 'मी बोलतो आहे ना...', असं बोलून तिला थांबवतो. 'तुम्ही जे केलं आहे, हे खरंतर महाराष्ट्रातील कोणत्याच आईला बिलकूल आवडलेलं नाही', असं रितेश रुचिताकडे पाहून म्हणतो. त्यानंतर रुचिता तोंड वाकडं करते, हे पाहून रितेश अजून भडकतो.
'हे असले हावभाव द्यायचे असतील तर, तुम्ही आत जा. इथे तुम्हाला जागा नाही', असं संतापून रितेश रुचिताला म्हणतो. भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? रुचिताला शिक्षा मिळणार का? तिचा या घरातून पत्ता कट होणार का? हे लवकरच कळेल. दरम्यान, भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'अल्फा'च्या सेटवर राडा; आलियाचं नेमकं कुणासोबत वाजलं? चित्रपट कधी अन् कुठे रिलीज होणार?