Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh Post: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) चित्रपटांसह आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याचा 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा सिनेमा प्रचंड गाजला.  अभिनेता सोशल मीडियातही (Social Media) सक्रिय असतो. त्याचे पोस्ट नेहमी व्हायरल होतात. रितेश देशमुखने अलिकडेच एक भावनिक पोस्ट आपल्या अधिकृत इ्न्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये त्याने आपले बाबा, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला रितेश देशमुखने भावनिक कॅप्शन दिलं आहे.  भावनिक कॅप्शन वाचल्यानंतर अनेक जण भावुक झाले.

Continues below advertisement

रितेश देशमुखची आपल्या वडिलांसाठी भावनिक पोस्ट, सोशल मीडियात व्हायरल (Riteish Deshmukh Shares Emotional Post Remembers Father)

Continues below advertisement

आज 14 ऑगस्ट. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची 14 वी पुण्यतिथी.  विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  या फोटोमध्ये रितेश देशमुख वडील विलासराव देशमुख यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोला रितेश देशमुखने भावनिक कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये रितेश देशमुख म्हणाला, 'तुम्हाला जाऊन आज 14 वर्षे झाली. माझा वनवास काही संपला नाही', असं म्हणत अभिनेत्याने आपली भावना व्यक्त केली.  

रितेश देशमुखची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या पोस्टवर रितेश देशमुखची पत्नी जेनिलिया देशमुख  हिने देखील कमेंट केली आहे.  अभिनेत्रीने तुटलेली हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.  जेनिलिया देशमुख व्यतिरिक्त इतर कलाकारांनाही  कमेंट करुन दु:ख व्यक्त केलं आहे.  तसेच आदरांजली वाहिली आहे.   इतर नेटकऱ्यांनीही रितेश देशमुखच्या पोस्टवर आदरांजली वाहिली. एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'महाराष्ट्रात  असा नेता पुन्हा होणे शक्य नाही.  विलासराव देशमुख साहेब...'. तर, आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये, 'लातूर म्हणजे साहेब अन् साहेब म्हणजे लातूर' अशी कमेंट केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं 14 ऑगस्ट रोजी निधन झालं होतं.  विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती. त्यांनी 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...