Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (दि.26) जयंती आहे. बाभुळगावच्या सरपंचपदापासून सुरु केलेला प्रवास ते महाराष्ट्राचे दोन वेळेसचे मुख्यमंत्री, अशी संघर्षमय प्रवास म्हणजे विलासराव देशमुख यांनी केला होता. त्यांच्या सर्वसमावेश नेतृत्वाच्या मोहिनी महाराष्ट्राच्या जनमानसावर रुजली होती. आता विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचं निधन होऊन 13 वर्ष उलटली आहेत. मात्र, त्यांच्या आठवणी आज देखील कायम आहेत.
विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने एक व्हिडीओ शेअर केलाय. विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने रितेश देशमुख याने त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. यावेळी त्याने व्हिडीओला 'पापा मेरी जान' हे गाणं वापरलं आहे. रितेश देखमुखचा (Riteish Deshmukh) हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी देखील कमेट्समध्ये सांगितल्या आहेत.
विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि बहुआयामी राजकारणी होते. बाभुळगावचे सरपंच म्हणून सुरु झालेले त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचली होती. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं होतं.
दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले : कार्यकाळ खालीलप्रमाणे
पहिली टर्म: 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003
दुसरी टर्म: 1 नोव्हेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यापूर्वीही वडिल म्हणजे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत भावूक झालेला पाहायला मिळाला होता. एकदा रितेश देशमुख याने वडिल विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या राजकारणाचं गणित उलगडून सांगितलं होतं. राजकारणात 2 आणि 2 बरोबर 4 असं गणित कधीच नसतं, ते कधी 3 असतं किंवा 5 असतं पण 4 कधीच नसतं. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचं राजकारणाविषयी या वक्तव्याचा आजच्या राज्यकर्त्यांकडूनही उल्लेख केला जातो. ते वाक्य रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) एकदा शेअर केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आतुरल्या डोळ्याचं सपान तू....रिंकू राजगुरुच्या मनमोहक अदा; इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो