Aastad Kale On Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं (Vaishnavi Hagavane Case) महाराष्ट्रात (Maharashtra News) खळबळ माजवली आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी सासरच्यांनी अक्षरशः वैष्णवीचा छळ करुन करुन तिला तिचं आयुष्य संपवायला भाग पाडलं. सध्या वैष्णवीच्या सासरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. वैष्णवीचा दीर आणि सासरे फरार झालेले, पण पोलिसांनी मागोवा घेत, त्यांनाही ताब्यात घेतलंय. अशातच संपूर्ण राज्यभरात हुंडाबळी प्रकरण आणखी तापलं आहे. एकंदरीच याप्रकरणी संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. अशातच आता मराठी अभिनेत्यानं यासंदर्भात केलेल्या पोस्टमुळे लक्ष वेधलंय. मराठी अभिनेत्यानं (Marathi Actor) वैष्णवीच्या जाण्याला जेवढे सासरचे जबाबदार आहेत, तेवढेच माहेरचेही जबाबदार आहेत, असं म्हटलं आहे. 

माहेरचेदेखील तेवढेच दोषी : आस्ताद काळे 

मराठी अभिनेता आस्ताद काळेनं (Astad Kale) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यानं म्हटलंय की, "संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या विशेषतः स्त्रियांच्या हाती द्यायला हवं. हुंडा मागणाऱ्या हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे. कायदा हा माणसांसाठी असतो. हैवानांसाठी नाही..." 

पुढे आस्ताद काळेनं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. आस्ताद काळे म्हणालाय की, "आपल्या मुलींच्या परिस्थितीबाबत, अवस्थेबाबत आई-वडिलांना किंवा कुटुंबियांना काहीच माहित नसतं?. की माहिती असूनही हे कोणी पाठिंबा देत नाहीत?. तसं असेल तर हे माहेरचेदेखील तेवढेच दोषी आहेत ना?"                 

वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी पुणे कोर्टानं, अटक केलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं 5 दिवसांची कोठडी मान्य केली. याआधीच अटक झालेला वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे, हे 26 मेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, शशांकनं वैष्णवीला पाईपनंही मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यामुळे हगवणे कुटुंबाविरुद्ध पोलिसांनी आणखी एक कलम वाढवलाय. तसंच, आतापर्यंत 12 जणांच्या साक्षीही नोंदवण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: 'तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय...'; अभिनेत्रीकडून दिग्गज मराठी अभिनेत्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर, खळबळजनक आरोप