Riteish Deshmukh : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक  भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं काही फोटो देखील या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. 


रितेशची पोस्ट
रितेशनं त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'मला तुम्हाला खट्टा मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना  बघायचं आहे. मला तो क्षण पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून  म्हणता की, मी तुझ्या कायमसोबत आहे.  मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची आठवण येते.' रितेशनं या पोस्टसोबतचं काही फोटो देखील शेअर केले आहेत.






रितेश हा सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या काही आठवणी देखील रितेश शेअर करतो.  विलासराव देशमुख यांच्या 75व्या जयंती निमित्त रितेशनं एक व्हिडीओ शेअर केला होता. रितेशने शेअर केलेला व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्सही भावूक झाले होते. व्हिडीओसोबत रितेश देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'हॅपी बर्थडे पापा, मी तुम्हाला दररोज मिस करतो.'  या व्हिडीओमधून रितेशन त्याच्या वडिलांबाबत असणाऱ्या भावना व्यक्त केल्या. 
 





 विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील बाभलगाव नावाच्या गावात झाला होता. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं.


संबंधित बातम्या