Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सिझनची काहीच दिवसांत सुरुवात होणार आहे. पण प्रेक्षकांना मात्र याची बरीच उत्सुकता लागून राहिलीये. कारण बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षक या सिझनची वाट पाहत होते. विशेष बाब म्हणजे प्रेक्षकांना सिझनच्या पहिल्याच प्रोमोमध्ये एक सरप्राईज मिळालं. या सिझनमध्ये होस्टच्या खुर्चीत चक्क रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) बसणार आहे. 


या सिझनच्या आधी रितेशने माध्यमांशी देखील संवाद साधला. त्यासाठी खास पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.  यावेळी त्याला हिंदी आणि मराठी बिग बॉसमधील त्याच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव विचारलं. तेव्हा रितेशने दिलेल्या उत्तराने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान हा स्पर्धक मराठी बिग बॉसच्या एका पर्वाचा विजेता देखील राहिला आहे. 


'हा' आहे रितेशच्या आवडीचा स्पर्धक


दरम्यान रितेशने नाव घेतलेला स्पर्धक हा दुसरा तिसरा कुणी नसून शिव ठाकरे आहे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. तसेच तो हिंदी बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता. त्यामुळे रितेशच्या आवडीच्या स्पर्धकाचं नाव ऐकून साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. 






बिग बॉस मराठीच्या घरात कोण कोण दिसणार?


येत्या 28 जुलै पासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात या सिझनमध्ये कोण दिसणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलीये. यामध्ये काही कलाकारांच्या नावाची देखील जोरदार चर्चा रंगू लागलीये. त्यामुळे आता हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. 


'हे' कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?


वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असंत! या मालिकेत दिसत होत्या. पण त्यांनी आता या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं आहे. त्यामुळे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. 


अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एन्ट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. 


दरम्यान चेतन आणि विवेक या दोघांच्याही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. त्यातच त्या दोघांचे सध्या कोणते प्रोजेक्ट सुरु आहे, याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे हे दोघेही आता बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 


ही बातमी वाचा : 


Kedar Dighe : बाळासाहेब हयात असताना आनंद दिघे शिंदेंना 'तो' कानमंत्र देतील का? धर्मवीर-2च्या 'त्या' डायलॉगवरुन केदार दिघेंचा सवाल