Ritesh Genelia: बॉलिवूडमधील सर्वात लाडकं आणि नेहमीच चर्चेत असलेलं कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा. (Ritesh Genelia)  सोशल मीडियावर त्यांच्या मस्तीखोर पोस्ट्स, क्यूट व्हिडीओ आणि कार्यक्रमांमधील त्यांची बॉन्डिंग कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही हे दोघं एकमेकांचा हात धरूनच दिसतात. मात्र, सध्या या गोड जोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून, त्यात जिनिलियाचे भाव पाहून नेटकरी चांगलेच चर्चा करत आहेत. हा व्हिडीओ एका बॉलिवूड पार्टीचा आहे, जिथे रितेश, जिनिलिया आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती एकत्र दिसत आहेत. पार्टी संपल्यानंतर बाहेर पडताना रिया तिथे रितेश-जिनिलियाला भेटली.

Continues below advertisement

रितेश आणि रिया यांच्यात थोड्या गप्पा सुरू असताना रियाने आपल्याकडे गाडी नसल्याचं सांगितलं. यावर रितेशने सहजतेने, “मी तुला सोडू का?” असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच जिनिलियाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. ती अस्वस्थ आणि नाराज झालेली स्पष्टपणे दिसत होती. तिचा तो रिअ‍ॅक्शनचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही. दरम्यान, रियाने लगेचच “नाही, माझी कार आहे,” असं सांगून विषय संपवला. तरीही रितेश आणि रियामधील संभाषण सुरू असताना जिनिलिया रागाने दोघांकडे पाहत असल्याचं व्हिडीओत दिसतं. हाच भाग सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Continues below advertisement

यानंतर घडलेला प्रसंगही चर्चेचा विषय ठरतोय. रियाने आधी जिनिलियाला जाऊन मिठी मारली, मात्र जिनिलियाचा प्रतिसाद फारसा उत्साही नव्हता. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही आनंदी भाव दिसत नव्हते. त्यानंतर रियाने रितेशची गळाभेट घेत ‘बाय’ म्हटलं. जाताना रियाने रितेशच्या दाढीला हात लावल्याचा क्षणही व्हिडीओत दिसतो.नंतर जिनिलियानेही रियाला हसत ‘बाय’ केलं, पण त्याआधीचा संपूर्ण प्रसंग आणि जिनिलियाचे बदललेले भाव सगळं काही सांगून गेले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, जिनिलियाच्या एक्सप्रेशन्सवर मजेशीर मीम्सही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. चाहत्यांमध्ये या व्हिडीओवरून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.