Genelia Breaks Down as Riteish Deshmukh Thanks Her Publicly:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा रुपेरी पडद्यातून अुभवता येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात बॉलिवूड तसेच मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी जिनिलिया देशमुख देखील या ट्रेलर लाँच कार्यक्रमात उपस्थित होती. दरम्यान, या ट्रेलर लाँच कार्यक्रमात जिनिलिया देशमुख भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तिला रडू अनावर झालं, तो क्षण उपस्थितांसाठी भावनिक  ठरला. रितेश देशमुख उपस्थितांना या चित्रपटाविषयी माहिती देत असताना भावनिक झाला होता.  त्यानंतर जिनिलियालाही रडू कोसळलं. 

Continues below advertisement

रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड कष्ट आणि  विशेष मेहनत घेतली.  दरम्यान, पती रितेश देशमुख या चित्रपटासाठी घेत असलेले प्रचंड कष्ट आणि चित्रपटाशी असलेली भावनिक नाळ पाहून जिनिलिया देशमुख मंचावरच भावूक झाली. रितेश देशमुखने ट्रेलर लाँचवेळी कलाकारांचे आभार मानले. यावेळी  रितेशने जिनिलियाला आपली 'सर्वात मोठी ताकद' म्हणत तिचं कौतुक केलं. 

वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावुक

'सगळ्यांचे मी आभार मानतो. संजू सर मी आभार व्यक्त करतो. मी त्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा म्हणालो की, आपले वडील एकमेकांना चांगले ओळखत होते. हा चित्रपट त्यांच्यासाठी करूयात. अभिषेकनेही  कोणताही प्रश्न न विचारता या चित्रपटात काम केलं.  अजय - अतुल यांचीही साथ लाभली. बमण इरानी सर, जितेंद्र यांना शुटिंगच्या एक दिवस आधी विचारलं, त्यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला',  असं म्हणत रितेश देशमुखने कलाकारांचे आभार मानले. यावेळी रितेश आणि जिनिलिया भावुक झाले.

रितेश देशमुखने जिनिलियाच केलं कौतुक

'जिच्याशिवाय हे सर्व घडू शकत नाही, ती व्यक्ती म्हणजे जिनिलिया.  स्वप्न पाहणं सोपं असतं. पण स्वप्न साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करवून घेण्याचा आत्मविश्वास कुणी दाखवला असेल तर, ती जिनिलिया आहे.  एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर,  अजून काहीच गरजेचं नसतं', असं रितेश देशमुख जिनिलियाविषयी म्हणाला. यावेळी जिनिलिया भावुक झाली. तिला स्टेजवर रडू  कोसळलं. यावेळी रितेशने जिनिलियाचे आभार मानले.  हा क्षण सर्वांसाठी इमोशनल करणारा होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर