Rinku Rajguru dance video : अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru dance video) हिने सैराट सिनेमातील 'सैराट झालं जी' गाण्यावर डान्स केलाय. विशेष म्हणजे रिंकू राजगुरु (Rinku Rajguru dance video) हिने पुन्हा एकदा सैराटच्या आठवणी जाग्या केल्यात. तिने हा डान्स व्हिडीओ शेअर करताना तिने "पहिलं ते पहिलच असत…सैराट झालं जी…!❤️" असं कॅप्शन दिलंय. रिंकू राजगुरुचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी रिंकूच्या (Rinku Rajguru dance video) या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी रिंकू राजगुरु नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे तिने गेल्या काही महिन्यांत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी रिंकू राजगुरु पंढरपूर वारीत सामील झाली होती. यावेळी तिने दिव्य सोहळा पाहूनी डोळा, या गाण्यावर एक रील देखील शेअर केलं होतं. विशेष म्हणजे रिंकू राजगुरु मोठ्या कालावधीनंतर वारीत सामील झालेली पाहायला मिळाली होती. यावेळी तिची वडिलही तिच्यासोबत होते.
अभिनेत्री नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मराठी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात ती मराठीतील नामवंत अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत झळकणार आहे. या सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ असं या चित्रपटाचं शीर्षक असून, तो 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून, निर्मिती रजत अग्रवाल यांनी केली आहे. अल्ट्रा मराठीच्या अधिकृत पेजवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या