Pune crime: पुण्यात वारंवार गुन्हेगारीचा घटना समोर येत असताना आता एक धक्कादायक प्रकार घडलाय. पत्रिका पाहून भविष्य वर्तवण्याचा दावा करणाऱ्या एका कथेत ज्योतिषाला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. भावासाठी एक वस्तू देण्याच्या बहण्याने ज्योतिषानं व्हॉट्सॲपवर मेसेज करून तरुणीला एकटीला बोलवलं . तरुणीनं विरोध केला पण ज्योतिषानं आपले खरे रंग दाखवलेच . महिलेला कानात मंत्र देण्याच्या बहाण्याने तिला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केला . महिलेनं कशीबशी आपली सुटका करत पळ काढला .
घटनेची तातडीने माहिती तरुणीने आपल्या भावाला दिली .आणि थेट पोलीस ठाणे गाठलं .ज्योतिषाविरोधात तक्रार दिल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी अखिलेश लक्ष्मण राजगुरू (45) असे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषाचे नाव आहे .या ज्योतिषाच्या विरोधात यापूर्वी अशा अनेक प्रकारचा तक्रारी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .
नेमके प्रकरण काय ?
देवाधर्माच्या नावावर पैसे उकळणाऱ्या गुरुजींची राज्यात कमी नाही . कुडमुड्या ज्योतिषांच्या अनेक घटना कानावर पडत असतानाच पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय . मोठ्या भावाची पत्रिका घेऊन 12 जुलै 2025 रोजी लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणी संबंधित ज्योतिषाच्या कार्यालयात गेली होती . पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची आहे त्यासाठी शनिवारी या असं सांगितलं . नंतर काही वेळाने ज्योतिषाने तरुणीला व्हाट्सअप वर मेसेज केला .तुमची वस्तू आली आहे ती घेण्यासाठी एकटीच ये . यावर तरुणीने मी नंतर वस्तू घेण्यासाठी येते असा मेसेज पाठवला .
18 जुलै रोजी ज्योतिषाने पुन्हा व्हाट्सअप वर मेसेज करून उद्या सकाळी दहा वाजता तुमची वस्तू घ्यायला या असे सांगितल्यानंतर तरुणी 19 जुलै रोजी कॉलेज वरून थेट ज्योतिषाच्या कार्यालयात पोहोचली .त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते .तुमच्या डोक्यावर वस्तू ठेवून काही मंत्र बोलावे लागतील असं सांगून ज्योतिषाने तरुणीला पडद्याच्या मागे बोलावले . ज्योतिषाच्या संशयास्पद हालचालींमुळे तरुणी सावध झाली होती .मला वस्तू नको मी नंतर येते असं सांगून ते उठली .कार्यालयातून बाहेर पडत असतानाच ज्योतिषाने डाव साधला . तरुणीला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केला .तरुणीने ज्योतिषाला ढकलून घाबरून कसा बसा कार्यालयातून पळ काढला .त्यानंतर तातडीने आपल्या मोठ्या भावाला फोन करून घडलेल्या प्रकार सांगितला .व स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली .
तरुणीने सहकार नगर पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली .त्यानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी ज्योतिषाच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली .या ज्योतिषाने यापूर्वीही अशा अनेक प्रकारचे चाळे महिलांबरोबर केले असण्याची शक्यता पोलिसांना वाटतेय .याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे .
हेही वाचा