मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह 6 लोकांना अटक केलं आहे. माहितीनुसार रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. शौविक आणि रियाच्या व्हाॅट्सअॅप चॅटमधून देखील याबाबत माहिती मिळाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एनसीबीच्या रडारवर आता अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा ही नावं आहेत, कारण ही नावं रियानं घेतली असल्याची माहिती आहे.


 नव्या कलाकारांसह एकूण 25 जणांची नावे 


रिया चक्रवर्तीने तपासामध्ये बॉलिवूड मधील काही नव्या कलाकारांसह एकूण 25 जणांची नावे घेतली आहेत. ज्यांना चौकशीसाठी एनसीबी बोलवण्याच्या तयारीत आहे. हे सेलिब्रिटी ड्रग्ज घेत असल्याची माहिती रियाने NCB ला दिली आहे. याच माहितीच्या आधारे आज एनसीबी मुंबई गोव्यामध्ये छापे टाकत आहे. तर शौविकने ड्रग्जसाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंट मधून पैसे देत असल्याची कबुली दिली तर सॅम्युअलने सुद्धा या माहितीला दुजोरा देत रियाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबूली दिली आहे. तसंच दोघांनी सुशांतच्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर व्हायचा आणि कोण कोण त्याचं सेवन करायचे याचीही माहिती दिली आहे.


Rhea Chakraborty Arrested: रिया चक्रवर्ती दोषी आढळल्यास किती वर्ष शिक्षा होऊ शकते?


रियानं ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत त्यांना एनसीबी समन्स पाठवणार असल्याची माहिती आहे. या लिस्टमध्ये बॉलिवूड चे अनेक ए ग्रेड सेलिब्रिटी आहेत. ज्यात अॅक्टर्स, डायरेक्टर्स, कास्टिंग डायरेक्टर्स, प्रोडक्शन हाउससह अन्य लोकांचा समावेश आहे. माहितीनुसार सारा अली खानचं नाव थायलंडच्या एका टूरमध्ये समोर आलं होतं. ती सुशांतसोबत तिकडे गेली होती. तर डिझायनर सिमोन खंबाटाचं नाव रियाच्या व्हॉट्सएप चॅटमधून ड्रग्ज प्रकरणात समोर आलं होतं. तर रियानं एनसीबी चौकशीदरम्यान रकुलप्रीतचं नाव घेतलं होतं.


Rhea Chakraborty NCB Arrest : रिया चक्रवर्तीची तुरुंगातील पहिली रात्र कशी होती?


SSR Case: ड्रग्स प्रकरणी रियासह सर्व आरोपींचा जामीन फेटाळला


रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला, ज्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांचा समावेश आहे. निकालाची प्रत हाती येताच मुंबई उच्च न्यायालयात सोमवार किंवा मंगळवारी या निकालाला आव्हान देऊ असं या आरोपींच्या वकिलांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात अनुज केसवानी व्यतिरिक्त इतर आरोपींना बुधवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, केसवानीला पुढील तपासासाठी एनसीबी कोठडीत ठेवण्यात आलं आहे.