Republic Day 2023: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 


अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला अभिमानास्पद वारसा जपण्याचा हा दिवस आहे. या वर्षी हा दिवस माझ्यासाठी सर्वात खास असणार आहे. का ते तुम्हाला लवकरच कळेल. जय हिंद.'






साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'आमची मातृभूमी सदैव समृद्ध होवो ! सर्वांना 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'






ए. आर. रहमाननं देखील ट्वीट शेअर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 






अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक खास व्हिडीओ शेअर करुन सर्व नेटकऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा.  जय हिंद! भारत माता चिरायू होवो!'










वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Gadar 2: 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा!'; तारा सिंह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा गदर-2 चं पोस्टर