Veteran Art Director Nitin Borkar Dies: मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन झाले आहे.  18 जानेवारी 2026 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून नितीन बोरकर ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर  डी. वाय पाटील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची जीवनाची ज्योत मालवली.  त्यांचा मृत्यू 18 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास झाले असल्याची माहिती आहे.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 40 हून अधिक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन म्हणून काम पाहिले. त्यांनी कला दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.  दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर एक अनुभवी आणि गुणी कलाकार गमावल्याची भावना मराठी इंडस्ट्रीतून व्यक्त केली जात आहे.  

ब्रेन स्ट्रोकमुळे नितीन बोरकर यांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार,  नितीन बोरकर यांना ब्रेन स्ट्रोकचा प्रचंड त्रास होता. गेल्या काही महिन्यांपासून त्या या आजाराशी झुंजत होते. त्यांची प्रकृती गंभीर होताच त्यांना उपचारासाठी डी. वाय पाटील रूग्णालयात हलवण्यात आले.  तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. त्यांनी 18 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास डी. वाय पाटील रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.  नितीन बोरकर यांच्या मृत्यूनंतर बोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी छाप सोडली

नितीन बोरकर यांनी आपल्या कारकिर्दीत   मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपली एक वेगळी छाप सोडली.   त्यांनी अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीतील चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले.   बोरकर यांनी आतापर्यंत 40 हून अधिक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं आहे. केवळ चित्रपट नसून, त्यांनी रंगभूमीवरही योगदान दिलं. राजवाडे अँड सन्स, बॉईज 3, मी वसंतराव यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.  पडद्यामागे राहूनही त्यांनी आपल्या कामातून मराठी चित्रपटांना एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं. 

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली

दरम्यान, नितीन बोरकर यांच्या अकाली निधनानंतर सिनेसृष्टीत न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.  बोरकर यांच्या निधनाची बातमी मिळताच मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच काही मराठी कलाकारांनी समाजमाध्यमांवर श्रद्धांजली वाहिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सिनेसृष्टीत खळबळ! रेमो डिसूझाकडून 50 लाखांची खंडणी, गँगस्टर रवी पुजारी अटकेत