Rekha had Affair With Pakistani Cricketer Imran Khan: बॉलिवूडची (Bollywood News) सौंदर्यवती, जिच्यासमोर आजही नवख्या अभिनेत्रीही ठरतात फेल, ती म्हणजे, रेखा. ऐंशी, नव्वदचं दशक गाजवणारी ही अभिनेत्री आजही आपल्या सौंदर्यानं भल्याभल्यांना वेड लावते. सोशल मीडियावर रेखा (Rekha) यांच्या आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा रंगलेल्या असतात. त्या कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असतात, तर कधी लव्ह अफेअरबाबतही असतात. 

सध्या सोशल मीडियावर 40 वर्षांपूर्वीची एक बातमी व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेखा यांचे पाकिस्तानी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. 1985 चा हा स्टार रिपोर्ट आता व्हायरल होत आहे. त्यानुसार, रेखा आणि इमरान खान अनेकदा एकत्र दिसल्याचंही सांगण्यात आलं आहे. अशातच पुन्हा एकदा रेखा आणि इम्रान खान यांच्या नात्याची बातमी चर्चेत आली आहे. 

80च्या दशकात रेखा आणि पाकिस्तान क्रिकेटर इमरान खान यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांनीही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मीडिया रिपोर्टनुसार, ते दोघे लग्न करणार होते. रेखाच्या आईलाही त्यांची जोडी पसंत होती. एवढंच काय रेखाच्या आईने ज्योतिषाला दोघांच्या पत्रिकाही दाखवल्या होत्या. ते दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच असल्याचं ज्योतिषाने सांगितलं होतं.

रिपोर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, "रेखा आणि इम्रानला समुद्रकिनाऱ्यावर ज्यांनी पाहिलं, ते लोक त्यांच्या केमिस्ट्रीनं प्रभावित झालेले आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की, ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात..."

रेखाच्या आईनं ज्योतिषाला पत्रिका दाखवल्या, पण... 

रेखा आणि इम्रान खान यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चांना वेगळं वळण तेव्हा मिळालं, जेव्हा रेखाची आई पुष्पवल्ली यांना इम्रान खान आवडतो, असं सगळीकडे पसरलं. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रेखा यांच्या आईला असं वाटत होतं की, इम्रान खान त्यांच्या मुलीसाठी चांगला जोडीदार आहे. म्हणून त्या दिल्लीतील एका नजुमी (ज्योतिषी) कडे गेलेल्या. त्यावेळी नजुमींनी काय सांगितलं, हे कुणालाच माहीत नाही. पण रेखाची आई इम्रानला तिच्या कुटुंबात आणण्यास तयार होती.

दरम्यान, रेखा आणि इमरान खान यांच्या लग्नाच्या चर्चा सगळीकडे जोरदार सुरू होत्या. रेखा यांच्या आईच्या संमतीमुळे चर्चांना उधाण आलेलं. दरम्यान, काही काळानंतर, दोघे वेगळे झाले आणि हे नातं अफवाच राहिलं, कारण रेखा किंवा इम्रान दोघांनीही हे नातं कधीच स्वीकारलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

राजेश खन्नाची हिरोईन, 28 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन, सावत्र बापाने केली होती हत्या